महिलांचा वास्तव सूर्य ‘ज्योतिबा’- डॉ. दिपाली रामभाऊ तायडे

कंधार


दि. 27- 3 -2022 रोजी मौजे कंधारे वाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात माजी सरपंच केशवराव कंधारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कंधार येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.दिपाली रामभाऊ तायडे यांनी वरील प्रतिपादन केले. पुढे बोलताना, महिला सबलीकरण म्हणजे, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणे, त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मसन्मान निर्माण करून देणे, त्यांच्या स्वातंत्र्याची आणि गतिशीलतेचे समर्थन करणे होय, असे सांगितले.

पिढ्यान पिढ्या पितृसत्ताक पद्धती मध्ये स्त्रीला ‘चूल व मूल’ यांच्यातच बंदिस्त केले होते, दिवस असूनही स्त्रियांचे जीवन अंधार्‍या रात्रीतच कायम होते, स्त्रीच्या जीवनात कधी सूर्योदय झालाच नव्हता, पहाटेच्या किरणांची कधी अशाच नव्हती, अशा अंधकारमय जीवनात ज्योतिबा या स्त्री शिक्षण नावाच्या सूर्याच्या आगमनाने स्त्रियांच्या दाहीदिशा उजळून निघाल्या. त्यांच्या हक्काची जाणीव होऊन मुक्या स्त्रिया बोलायला लागल्या, कुटुंबाचा भार सांभाळून पुरुषाबरोबर चालायला लागल्या, सर्व क्षेत्रात स्वतः निर्णय घेऊ लागल्या, अत्याचारा विरुद्ध आवाज उठऊ लागल्या, परंतु हे करताना स्त्रियांचा कुठेतरी आवाज दाबला जात आहे जातीचे, पक्षाचे, धर्माचे, लेबल लावल्या जात आहे, याच्याही पलीकडे जाऊन वास्तव, खऱ्या महिला सबलीकरणासाठी सर्व स्त्रियांनी एकत्रित येऊन खर्‍या अर्थाने स्त्री एक धर्म, स्त्री एक जात स्त्री एक पक्ष समजून भेदाभेदीच्या जोखडातून मुक्त होऊ! या असा संदेश दिला.

या कार्यक्रमासाठी जयश्री कंधारे, मिराबाई गीते, जिजाबाई गीते, जनाबाई मोकमपल्ले, रावसाहेब कंधारे, बंडू मोकमपल्ले गावकरी अॅड. कृष्‍णा गोटमवाड, अंबादास मोकमपल्ले,महाविद्यालयातील ग्रंथपाल सुनील आंबटवाड, विक्की यन्नावार, ब्रह्माजी तेलंग, शेख अलीम व स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी डॉ. पी.एल. डोम्पले यांनी केले तर उपस्थितांचे आभार हणमंतराव मोकमपल्ले यांनी मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *