फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार ता. ३० मार्च रोजी सदगुरु बस्सय्या स्वामी महाराज मठ संस्थान येथे अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. श्री श्री श्री १०८ ष.ब्र. सद्गुरु राष्ट्रसंत शिवैक्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आशीर्वादाने व श्री श्री श्री ष.ब्र. सद्गुरु सोमलिंग शिवाचार्य स्वामी बिचकुंदेकर, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने ३० वा अखंड शिवनाम सप्ताह सुरुवात झाला आहे.
शिवनाम सप्ताह ता. ३० मार्च रोज बुधवार पासून प्रारंभ झाला असून ता. ४ एप्रिल रोज बुधवार टाळ आरती कीर्तन व परम रहस्य ग्रंथ मिरवणूक होईल आणि शिवनाम सप्ताहाची सांगता होईल.
वारकरी संप्रदायामध्ये अखंड शिवनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे टाळ आणि मृदूंगाचा निनाद , शिव नामघोष अशा मंगलमय वातावरणात हा अखंड शिवनाम सप्ताह पार पडणार असून संप्रदायाच्या परंपरेनुसार रोज सकाळी शिवपाठ, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, गाथ्यावरील भजन , शिव कीर्तन , शिजागर व नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे तसेच प्रसादाचे आयोजन दररोज करण्यात येते.
या नामयज्ञात कीर्तनकार म्हणून विकास महाराज धसवाडीकर , किशोरीताई ताकबीडकर , मन्मथ डांगे उस्माननगर , शिवकांत पळसकर लोहा , अमोल लांडगे वसमतकर , कावेरीताई मुदखेडे वनभुजवाडीकर , सोनबा शिरोळे फुलकळसकर , लक्ष्मण स्वामी फुलवळकर , बाबू महाराज येलूरकर यांची उपस्थिती राहणार आहे.
अखंड शिवनाम सप्ताह व कल्याच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात आले आहे .