कंधार
कंधार दगडसांगवी या मार्गावर घोडज, शेकापूर, संगवामाडी, तळयाचीवाडी, काशिराम तांडा, हिरामन तांडा, सोनमाळ तांडा, पाताळगंगा, गनानाईक तांडा, पळसवाडी, उमरज व दगडसांगवी गावे असून या मधील काही गावांना इटरनेट नेटवर्कची समस्या असल्यामुळे गावातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रमापासून वंचीत रहात आहे. त्यांना या अभ्यासक्रमासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणे अनिवार्य झाले आहे.
वरील गावातील विर्थ्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असून त्याना कंधार येण्यासाठी हे बस गाडया उपलब्ध होत नाहीत. या मार्गावरील बससेवा काही दिवसापूर्वी पासून बंद झालेली आहे. म्हणून या विद्यार्थांना व गावकऱ्यांना तालुक्याचा संपर्क होत नाही.
तरी वरील मार्गावरील गाडी पूर्वी प्रमाणे चालू करुन गावकऱ्यांची व विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी अन्यथा विद्यार्थी व गावकरी यांच्या वतीने माजी सैनिक संघटना लवकरच आपल्या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार असा इशारा निवेदनाद्वारे माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिला आहे.