उदगिरचे साहित्यसंभेलन एक अविस्मरणीय आठवण…!!

    १एप्रिल रोजी प्रा. राजपाल पाटिल सर यांचा फोन आला,मॅडम ९५व्या आखिल भारतीय साहित्यसंमेलनात कविता सादर करण्यासाठी आपल्या कवितेची निवड आलेली आहे,आणि तुमची राहाण्याची आणि भोजनाची व्यस्था सुध्दा केली आहे.तुम्ही येणार आहात का ते नक्की कळवा.दुस-याच दिवशी अनिता सोनवणे यांचा फोन आला आणि मी हो येणार आहे असे कळवले. त्याचवेळी उदगिरला जाण्याचे पक्के ठरले.९५ व्या आखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे उदघाटन राष्ट्रवादी काॅग्रेजचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थाटात पार पडले,शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून ग्रंथदिंडी खूपच उत्साहात पार पडली.सर्वत्र साहित्यसंमेलनाच्या बातम्यांनी मनात उत्साह भरला होता.संमेलनाला अध्यक्ष म्हणून भारत सासणे हे लाभले होते.तर आ.बस्वराज नगराळकर पाटील यांनी साहित्यसंमेलनाची धुराआपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली हे त्यांनी त्यांच्या कृतितून सिध्द करुन दाखविले.
२३तारखेला मी सकाळी ६:००वाजता बॅगलोर एक्सप्रेसने उदगिरकडे रवाना झाले.माझ्या आयुष्यातला हा पहिला एकटीचा प्रवास होता,मनात असंख्य प्रश्नांना घेऊन मी उदगिर गाठले.उदयगिरी माहाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळील भव्यकमान,कमानीच्या बाजूलाच मदत कक्ष,नावनोंदणी कक्ष होते.त्याठिकाणी प्रथम नाव नोंदणी केली,श्री.छत्रपती शाहूमहाराज सैनिक महाविद्यालयाचे प्राध्याक वर्ग त्या ठिकाणी होता,ते सर्वांना योग्यमार्गदर्शन करत होते.स्वयंसेवक देखिल अगदि तळमळीने काम करतांना दिसले.भव्यदिव्य कमानीतुन आत प्रवेश केल्यावर डोळ्याचे पारणे फिटले.महाविद्यालयाच्या जागेतील भव्यदिव्य मंडप ऊन्हाचा त्रास लागू नये म्हणून जागोजागी थंडपाणी,शरबत,मठ्ठा ची मोफत व्यवस्था केली होती.सर्वच वयोगटातील रसिक मंडळी या संमेलनाचा अगदि मनपुर्वक अस्वाद घेताना दिसत होती.माझ्या कवितेच सादरीकरण २४तारखेला ११ते १च्या दरम्यान होत.त्यामूळे आज दिवसभर परिसंवाद,कथा,आणि गझल ऐकण्याची नामी संधीच मला मिळाली,गझलकट्यावर तर अक्षरक्षा टाळ्यांचा प्रचंड कडडाट होत होता.मळभ दाटलेल्या मनावर नवचैतन्यांच मोरपीस फिरल्याचा भास क्षणभर झाला आणि गझलेचे पंख लेवून मन गतकाळात अलवार डोकाऊन देखिल आले.एकापेक्षा एक गझल सादरीकरणाने मन तृप्त झाले.बालसाहित्यसंमेलन देखिल रंगतदार झाले,त्यांच्यासाठी वेगळा मंच हे संभेलनाचे प्रमुख वैशिष्ट्ये होते.संगित,लावणी,कथ्थक,पाहातांना श्रोते मंत्रमुग्ध झाले.दिवस कुठे गेला ते कळलेच नाही,संध्याकाळी ९वाजता कविकट्यावरील निमंत्रीत कवि-कवयित्रीची राहाण्याची व्यस्था श्री.छत्रपती शाहूमहाराज सैनिक स्कूल येथे केली होती,त्यासाठी जाण्यायेण्याची व्यस्था देखील होती,मी एकटीच ब-याच वेळ इथे थांबून होते नंतर चौकशी कक्षात चौकशी केली असता अवघ्या दहामिनीटात माझी नियोजीत ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली गेली.कारमध्ये माझ्यासोबत संजय कुलकर्णी आणि सौ.अंजली कुलकर्णी होत्या.निसर्गाच्या सानिध्यात असलेले झाडाफुलांनी वेढलेल्या सैनिकस्कूलच्या प्रशस्त अब्दूलकलाम हाॅस्टेलमध्ये नावनोंदणी करुन आम्हाला आत सोडले.यावेळी देवणीकर सर, मारकवाड सर, कांबळे सर आणि प्रा.युवराज दहिफळे(गंगाखेडकर) सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या ठिकाणी प्रशस्त मोठ्या हाॅल मध्ये ब-याच साहित्यीक भगिनी सोबतीला होत्या,मी खूप थकल्यामुळे मला लवकर झोप लागली पण रात्रभर हाॅल मध्ये कविसंमेलन रंगल्याच सकाळी उठल्यावर समजल,त्यावेळी थोड वाईट देखिल वाटल.माझ्यापेक्षा सर्वजणी वयाने खूप मोठ्या होत्या पण त्यांच्यात खूप उत्साह भरभरून ओंसडून वाहात होता.आपूलकीच एक नात आमच्यात तयार झाल होत एकाच दिवसामध्ये आमच्यात छान मैत्री झाली होती,सकाळीच गरमगरम चहाची आणि बिस्कीटची व्यस्था इथे करण्यात आली होती, सर्व तयारी करुन आम्ही सर्वजणी बसमध्ये बसून साहित्यसंमेलनाच्या ठिकाणी गेलो.नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली होती.देविसिंह चौव्हाण सभागृह,शांता शेळके कविकट्टा मंचावर  अकरा वाजता दुस-यासत्रामध्ये माझ्या कवितेचे सादरीकरण झाल,

कविता सादरीकरणाचा अनुभव खुप छान होता…एकापेक्षा एक सरस कविता इथे ऐकण्यास मिळाल्या.सौ.अंबिका पारसेवार मॅम,विवेक होळसांबरेकर,मुकेश कुलकर्णी यांनी कविकट्टासाठी संपुर्ण वेळ देऊन व्यस्थीत नियोजन केले होते.त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


सोशल मिडीयावर रोज आॅनलाईन भेटणा-या मैत्रीणींची साहित्यसंमेलनात प्रत्यक्षात भेट झाली.तो क्षण खरच खूप मौल्यवान होता.त्यात खास करुन हैद्राबादच्या सुरजकुमारी गोस्वामी,युवा कवि बालाजी लखणे,विजया मारोतकर,शोभा कोठावदे यांना भेटून आनंद झाला.पुस्तकांचे स्टाॅल वाचन संस्कृतीला चालना देण्याचे कार्य करत होते,या ठिकाणी बरेच पुस्तक विक्रीस ठेवण्यात आले होते.प्रत्येकजण कुठल ना कुठल तरी पुस्तक खरेदी करुन समाधानाने तृप्त झालेला दिसत होता.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारतामध्ये अनेक ठिकाणी भरविल्या गेले परंतु उदगीर येथील साहित्य संमेलनाची मजा काही औरच होती!

कुठल्याच साहित्य संमेलनामध्ये कविची राहाण्याची आणि भोजनाची व्यस्था नसते,पण उदगिर येथे जे शक्य नाही ते शक्यकरुन दाखवले,तालुक्याचे गाव असले तरी व्यस्थेमध्ये ते कुठेच कमी पडले नाही.म्हणून व्यवस्थापन समितीचे अगदि मनपूर्वक आभार.तसेच कविता सादरीकरणानंतर सन्मानपुर्वक देण्यात आलेल्या स्मृती चिन्हाची आणि प्रमाणपत्राची गोड आठवण नेहमीच आमच्या स्मरणात राहिल.उदगीर करांनी अ. भा. सा. संमेलनाचे शिव धनुष्य समर्थ पणे पेलले.कविता एक निम्मित होते,पण या कवितेने असंख्य माणसे जोडली गेली.ही अ.भा.सा.सभेलनाची फलश्रूती आहे.

या गोड आठवणी कायम आमच्या मनाच्या गाभा-यात राहातील.बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलिसबांधवांनी देखिल आपले कार्य चोख बजावले…कविता सादरीकरणाच्या पंधरा मिनीट आगोदर ऊन लागल्यामूळे माझी तब्येत अचानक बिगडली होती, त्यावेळी त्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरु शकणार नाही.कला आणि साहित्याची सांगड घातलेला हा अविस्मरणीय सोहळा न भूतो न भविष्यतो..असाच ठरला…!!शेवटी उदयगिरी महाविद्यालय आणि छत्रपती शाहूमहाराज सैनिकीस्कूलच्या सर्व कर्मचारीवर्गाचे मनपूर्वक आभार ज्यांनी रात्रदिवस अथक परिश्रम करुन हे समेंलन यशस्वी केले.

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *