महात्मा फुले विद्यालय नवामोंढा कंधार शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के

कंधार ; प्रतिनिधी

संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित कंधार येथील महात्मा फुले विद्यालय नवामोंढा या शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल 2022 चा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून डफडे श्रद्धा नागनाथ – ९६ टक्के ,केंद्रे श्रेया विघासागर केंद्रे -९५.४० , भालेराव प्राजक्ता ज्ञानोबा – ९४.२०, गित्ते स्वप्नाली चंद्रकांत – ९३.४० , गित्ते श्यामसुंदर भास्कर -९३.२० , कदम पवन गणेश – ९३.२० , कु पठाण आहाना अफजल खॉ ९२.८० ,सगळे भाग्यश्री मारोती -९२.८० , गुंडाळे राजेश्वर नागनाथ – ९२.२०, राठोड रोशन संतोष -९१.८० , गडंबे अश्विनी अशोक -९१.६० आदीनी घवघवीत यश संपादन केले आहे .

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी . एन . केंद्रे , सचिव चेतनभाऊ केंद्रे , मुख्याध्यापक जे .जी . केंद्रे , प्राथमिक मुख्याध्यापक वाघमारे डी. जी यांनी अभिनंदन केले आहे .

यशाची परंपरा चालू ठेवली असल्याने सर्वत्र यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे .विशेष म्हणजे विशेष प्राविण्य ५१ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत चार विद्यार्थी पात्र ठरले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *