मातीमोल झाला शेतशिवार , सात दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने दिवसाही अंधार..
झाला शेतशिवार , सात दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने दिवसाही अंधार..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
गेले आठवडाभरापासून चालू असलेल्या सतंतधार पावसामुळे छोट्या मोठ्या तलावांची पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ओढे , नाले , नद्या तुडुंब भरून वाहत असून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून खरिपातील कापूस , सोयाबीन , ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच हळद ही पिके पिवळे पडत असून बालवयातच अति पावसामुळे तग सोडलेली पिके पुन्हा कसा जीव धरतील या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत असलेली प्रतिक्रिया म्हणजे मातीमोल झाला शेतशिवार , सात दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने दिवसाही अंधार , शेतशिवारांचे पंचनामे करून सरकार देईल का शेतकऱ्यांना आधार..
शेती पिकांबरोबरच दैनंदिन मानवी जनजीवन ही झाले विस्कळीत.
गेले आठवडाभर दररोजच्या सतंतधार पावसामुळे घराबाहेर पडणे जिकरीचे झाले असल्याने , व मजुरांच्या हाताला काम लागत नसल्याने दैनंदिन दिनचर्या चालवणेही अवघड होऊन असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
ता.१२ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे फुलवळ येथील नदीला पूर आल्याने जुनेगावठाण व नवीन गावठाणचा संपर्क तुटल्याने रहदारी बंदच आहे. त्यातच आज ता.१२ जुलै रोजी चालू झालेला पाऊस अद्याप बंद झालाच नसल्याने आज ता. १३ जुलै रोजी दुपारी ही पुलावरून आजही जोरदार पाण्याच्या वाहण्याचा प्रवाह चालूच आहे.