निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।।

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज निरूपणासाठी केलेला हा अभंग वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाचा आहे. भाविक भक्तांना त्यांनी या अभंगातून कसे वागावे हे सांगितले आहे. मानवाने आपल्या परीने प्रयत्न करावा, एखादा निश्चय केल्यानंतर तो शेवटपर्यंत घेऊन जावावे तर त्यांना जीवनात यशस्वी होता येते,.


आज आपण सर्वत्र पाहतो एखाद्या व्यक्तीने एखादी इच्छा व्यक्त केली, निश्चय केला तर तो थोड्याच दिवसात सोडून देतात, नवीन वर्ष सुरु झालं की संकल्प करतात,आणि चार दिवसात सोडून देतात, मी असं करीन मी तसं करीन अशा वल्गना चारचौघात करतात, आणि थोड्याच दिवसानंतर त्याचा विसर पडला की सोडून देतात, असे न करता जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात.निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ ।।तुम्ही असा निश्चय करा की तुम्हाला जीवनात यशस्वी होता आले पाहिजे .म्हणून राष्ट्रपती ए,पी,जे अब्दुल कलाम हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ झाले, लहानपणापासून श्रम करून आपल्या आई- वडिलांचे नाव मोठे केले.
असा निश्चय केल्यास जीवनात अनेक जणाला यशस्वी होता येते, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून समाजातील लोकांना दाखवून दिले, वेगवेगळ्या विषयावर संशोधन करून शास्त्रज्ञ झाले. ‘अग्निपंख’ मधून त्यांनी आपल्याला मौलिक असे मार्गदर्शन केले. म्हणूनच त्यांना आपण ‘मिसाईल मॅन ‘असे म्हणतो,याचाच अर्थ
निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।।असा घ्यावा लागतो.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर पालिकेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करून जागतिक किर्तीचे महामानव झाले, त्यांचा असा निश्चय होता की ते अठरा-अठरा तास अभ्यास करायचे म्हणून त्यांनी संविधाना सारखा महान ग्रंथ लिहिला. घटनेचे शिल्पकार झाले,म्हणूनच त्यांना’ आपण विश्वरत्न ‘म्हणतो, त्यासाठीच श्रम करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ,म्हणून म्हणतो तुम्ही नीट अभ्यास करा आणि वरील व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा यांच्यासारखे होण्यासाठी अपार श्रम करा “प्रयत्नाने वाळूचे कण रगडीता तेलही गळे”असे म्हणतात
.म्हणून प्रयत्नवादी बना नशीबवादी होऊ नका, त्यासाठी आपणास निश्चय करावा लागतो.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कामगारावर अनेक कथा -कादंबऱ्या साहित्य लिहिले.त्यांनीअसा निश्चिय केला की स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले, भारता पासून रशिया पर्यंतचा प्रवास करून त्या ठिकाणची माहिती घेतले, आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा पोवाड्यातून लोकांचे मनोधैर्य उंचावेल,असे गीत गायले, कथा-कादंबर्‍या पोवाडे यांच्या मधून समाज परिवर्तन केले, ही” पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर बसलेली आहे. “हा खरोखरचा मंत्र त्यांनी मानवाला दिला, त्यामुळे त्यांचे साहित्य मानवतावादी आहे,भाकडकथा, दंतकथा,काल्पनिक कथा, न लिहिता वास्तविक कथा त्यांनी लिहिल्या. आणि समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलं म्हणून तर म्हणतात .

निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळं ।।आपणाला असे सांगावे वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना एकत्र केले, रोहिडेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतले, तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि संकल्प केला की या ठिकाणी होणारे अन्याय, अत्याचार थांबविणार! आणि आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण करणार ही शपथ त्यांनी पूर्णत्वाला घेऊन गेले,निश्चयाचा महामेरू। बहुत जनाशी आधारू ।। अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।। तेव्हापासून रयत आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराजा विषयी अपार प्रेम निर्माण झाले. म्हणून निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।। त्यामुळे आपले बळ एकत्रित करावे, आपण सर्वजण एक आहोत हे संत तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकात सांगून गेले,
मानवतावादामधून शिक्षण घेत असते वेळेस सर्व मानवानी एकत्र यावं! एकमेकावर कुरघोडी करू नये, कोणतेही काम करायचे असेल तर एकीची साथ महत्त्वाची असते, म्हणून निश्चय करा, राष्ट्रीय एकात्मता दाखवा एकमेकाच्या धर्मावर जाऊ नका, एकमेकाच्या धर्माची उणीदुणी न काढता ,साने गुरुजींनी सांगितलेला खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे ।। या नात्याने चालले तरच आपला विकास होईल! आपण महासत्ता होऊ नाही तर तू तू मै मै करून कोणतेच कार्य सफल होणार नाही ,असे मला वाटते, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी निश्चयाचे बळ सांगताना आपल्या मध्ये परिवर्तन करण्यासाठी हा अभंग दिलेला आहे, अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. घरामध्ये अठराविश्व दारिद्रय असतानासुद्धा शिक्षण शिकून एवढ्या उच्च पदावर जाण्यासाठी खरोखर निश्चयाचे बळच लागते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा लहानपणापासून श्रम करून शिक्षण शिकून आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन संपूर्ण अमेरिका खंडाचे मन जिंकले, कारण त्यांनी निश्चय केला होता की आपण एखाद्या उच्च पदावर जाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात हे त्यांनी अगोदरच करून घेतल्या होत्या ,
तसेच समाजसुधारक नेल्सन मंडेला यांनी सुद्धा मानवतावादी दृष्टिकोनातून समाजाला मार्गदर्शन केले,अनेक वर्षे तुरूंगवास भोगला, परंतु मानवता वादासाठी त्यांनी अहोरात्र कार्य चालू ठेवले, आपणअशा महान व्यक्तींचा त्यांनी गौरव केला पाहिजे. झाशीच्या राणीचा इतिहास खरोखर अभ्यासला तर आपण सुद्धा पुढे जाऊ शकतो, स्फूर्तीदायी जीवन जगता येते.

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पतीने त्यांना टाकून दिले (सोडून दिले) तर त्यांनी निश्चय सोडला नाही त्या अनाथांच्या माई झाल्या .हजारो लेकरांच्या आई झाल्या. कधीही त्यांनी आपल्या चेहऱ्यावर राग दाखवला नाही,अनाथांना आणि गायीला त्यांनी जवळ केलं आणि आनाथाची माई म्हणूनच स्वर्गवासी झाल्या. निश्चयाचे बळ फार मोठे असते,
मोठे होण्यासाठी कष्ट करावे लागतात. चंदनासारखे झिजावे लागते तरच आपल्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळतो.”बोलाचा भात आणि बोलाची कढी ” करून कोणीही मोठं होत नाही, प्रत्यक्ष घामाच्या धारा गाळावे लागतात, तेव्हा कुठेतरी आपल्या कार्याची नोंद होते, म्हणून आयुष्यात एखादा निश्चय करा, आणि तो शेवटपर्यंत घेऊन चला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पतीच्या निधनानंतर सुद्धा अनेक वर्षे राज्य कारभार केले, घाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला ,शत्रूला सळो कि पळो करून सोडले, परंतु आपला निश्चय थोडासुद्धा ढळू दिला नाही, म्हणून तर त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ म्हणतात. मी महिला आहे हे त्यांनी कुठेही आडवे येऊ दिले नाही. आपण शूर आहोत आणि आपल्या प्रजेला आपली गरज आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्या अमर झाल्या आहेत ,म्हणून निश्चय असा करा की तुमच्या पासून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे, तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघा पती-पत्नी असा निश्चय केला की बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षणच आहे, आणि ते शिक्षण देण्याचं काम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केल्यामुळेच आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जगातील पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या आहेत,त्यांच्या वर अनेक संकटे आली परंतु त्यांनी तेवढ्याच जिद्दीने परतून लावले.
,म्हणून आज त्यांच नाव जनसामान्यां मध्ये लोकप्रिय झाले आहे.
पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाने “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” असे नामकरण केले आहे. हाच त्यांच्या कार्याचा मोठा विजय आहे.यासाठी कार्य करत रहा, यश मिळत राहील,
आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंदा सारखे जीवन जगले पाहिजे,मनोधैर्य वाढविले पाहिजे, एकाग्रता निर्माण केली पाहिजे,
आपण सर्वांनी मिळून सत्कृत्ये करावी लागतात, लोकसंख्या वाढली म्हणजे देश मोठा झाला, असा त्यांचा अर्थ होत नाही, अनेक क्षेत्रात आपण कमी आहोत, याचे सिंहावलोकन करावे, लागणार आहे, आजच्या तरुणांनी वरील सर्व महान व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन निश्चय करावा. आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल ,असे वर्तन करावे .चुकीच्या मार्गाने न जाता चांगल्या मार्गाने जाऊन आपल्या देशाचा विकास होईल, असे महान कार्य करावे.

प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *