भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक लाख शाळांमधून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन – कृष्णा हिरेमठ

शिक्षक महासंघाचा उपक्रम

सोलापूर :अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ या राष्ट्रव्यापी शिक्षक संघटनेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 1 ऑगस्ट 2022 रोजी शाळा मधून भारतमातेचे प्रतिमा पूजन व स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


हा राष्ट्रीय उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य कृष्णा हिरेमठ यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारत मातेच्या प्रतिमापूजन कार्यक्रम एक लाख शाळांमधून करण्याचा संकल्प होता परंतु संपूर्ण देशांमधून या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1 लाखा पेक्षा जास्त शाळांची नोंदणी केली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ या संघटनेच्या वतीने राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधून हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.


हा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम राज्यभरात उत्साहात साजरा करण्यासाठी शिक्षक महासंघाच्या वतीने शाळा संपर्क अभियान राबविण्यात येत असून शाळांना भारतमातेची प्रतिमा भेट देऊन या कार्यक्रमाविषयी माहिती सांगण्यात येत आहे. यासाठी शिक्षक महासंघाचे सर्व तालुका, जिल्हा निहाय पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
1 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये प्रभात फेरी काढून देशभक्तीपर गीत सादर करून भारत मातेचे प्रतिमापूजन केले जाणार आहे यावेळी भारत मातेची आरती गायली जाणार आहे. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना बोलून त्यांचा गौरव केला जाणार आहे व या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहेत.


1 ऑगस्टला जास्तीत जास्त शाळांनी भारतमातेच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम साजरा करावा असे आवाहन शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

(इंडिया से भारत की और
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्हात इंडिया से भारत की और या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या व्याख्यानाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा , भारताचा वैभवशाली इतिहास याचे संवर्धन करण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *