मा.देवेंद्रजी फडणविस साहेब नमस्कार …येणार्या गणेेशोत्सवा बद्धल आपणास व आपल्या परीवारास माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाकडूण हार्दिक शुभेच्छा.बाकी आताशा आपणास शिक्षकांच्या शुभेच्छा चालतात की नाहि हा प्रश्नच आहे.कारण आपल्या सहकार्यापैकी एक स्वत:स आदरणिय समजणारे प्रशांत बंब सध्या जे विधानसभेत व विधानसभे बाहेर शिक्षकांबद्धल अक्कलेचे तारे तोडत आहेत अन त्याबद्धल ईतके शिक्षक व शिक्षकांच्या संघटना निषेध व्यक्त करूण सुद्धा आपण मौन आहात, कारण काय?? का या प्रकाराला किंवा शिक्षक खोटारडे आहेत या विधानाला आपलि मूक सहमति आहे काय???हे आम्हाला व शिक्षकांना खर काय ते समजु द्या .. साहेब,
पण ह्या असल्या ना लायक आमदाराला आपलि जर सहमति असेल तर हे महाराष्ट्राचे निश्चित दुर्देव आहे.साहेब महाराष्ट्रातिल सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी आमच्यासह अनेकांनी एके काळी मुख्यालयी राहूनचं duty केलेलि आहे…अन आजहि अनेक तरूण शिक्षक पाड्यावर ,तांड्यावर ,गडचिरोलिच्या नक्सलाईट एरियात काम मुख्यालयी राहूनच करीत आहेत. अन आमच्या सारखे बहुसंख्य duty च्या लगत च्या शहरात किंवा तालुका ठिकाणी राहून कर्तव्य बजावत आहोत हे वास्तव…पण याचा अर्थ आम्ही कामचुकार आहोत किंवा खोटारडे आहोत हे म्हणने आपल्याला कितपत बरोबर वाटते??… ह्या महाशयांनी किती शिक्षकांची नार्को चाचणी केलि हे ही एखदा विधानभवनच्या पटलावर येऊ द्या…विधानभवनात सदस्यांना विचारस्वातंत्र्य आहे हे मान्य पण याचा अर्थ उचललि जीभ लावलि टाळूला हे स्वातंत्र्य घटनाकारांना अपेक्षित नव्हते…अन असले लोक आमदार होतिल हे ही घटनाकारांना अपेक्षित नव्हते …कारण ज्या संस्कृतित गुरूंना देवापेक्षा मोठे स्थान दिले आहे त्या संस्कृतिचे रक्षक म्हणवणार्या पक्षांचे आपण प्रमुख आहोत तरी आपला सहकारी शिक्षकांविषयी ईतकी गरळ ओकतोय तरी आपण मौन का??? साहेब , शिक्षकांचीच पगार का समाजाच्या मनात खुपवण्याचं पाप आपल्या सहकार्याकडूण होत आहे??? गुरू च्या मुलाला दुध म्हणून पीठाचं पाणी पाजवणार्याला समाजाला महाभारता सारख युद्ध झेलाव लागल होतं अन कुलक्षय ही ओढावून घ्यावा लागला होता हे ही वास्तवं…..बाकी माऊलीने 13 व्या अध्यायात गुरूंचा अनादर करतो तो एक अज्ञानी समजावा हे सांगितलेचं आहे….अन गुरूंची विद्या घेऊण गुरूवर उलटला तो एक मुर्ख समजावा हे समर्थांचे वाक्य सर्वश्रुत आहे… बाकी ह्या माणसाला आपण थांबवताल ही अपेक्षा .आम्ही तर विचलित न होता अनेक शासकीय अशासकीय परीपत्रकानुसार लादलेले काम करीत अविरत ज्ञान यज्ञ चालूच ठेवणार आहोतं..बाकी कळावे लोभ असावा….