कार्यानुभवा अंतर्गत पर्यावरण पूरक मातीचे,लाल मातीचे ,शाडूच्या मातीचे गणपती बनवणे बाबत पानशेवडीच्या जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थांची कार्यशाळा घेण्यात आली .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी येथे कार्यानुभव अंतर्गत पर्यावरण पुरक मातीचे लाल मातीचे शाडुच्या मातीचे गणपती बनवणे ची कार्यशाळा अतिशय उत्साहात मोठ्या थाटामाटात कार्य करण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष ,सदस्य ,विद्यार्थी ,पालक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल, शिक्षक कैलास गरूडकर, प्रजाल शिंदे, दत्ता मुंडे, रत्नाकर केंद्रे, दिगंबर मरशिवणे, देवराव ताटे,सौ अंजली उमाटे, सौ मनिषा हिमटे व शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस इत्यादी उपस्थित होते.