पीएम – किसान “योजनेतील लाभार्थ्यांनी ७ तारखे पर्यंत आधार लिंक करून घ्यावी -तहसीलदार व्यंकटेशमुंडे

कंधार ;कंधार तालुक्यातील पात्र लाभार्त्यांनी पीएम -किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या बँक बचत खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य आहे.
७ सप्टेंबर ही शेवटची तारीख असून इ-केवायसी ‘कारणाऱ्यांनाचा या योजनेचा लाभ मिळेल ,अन्यथा त्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार नाही . तेव्हा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नाही त्यांनी करून घ्यावे असे आवाहन कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.

पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्त्याना वर्षा काठी सहा हजार रूपये मिळतात.चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात .पण त्यासाठी इ -केवायसी असणे गरजेचे आहे.
कंधार तालुक्यातील १३ हजार ६५६पात्र शेतकऱ्यांनी अदयापही त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक केलेली नाही. मध्यंतरी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्यात पीएम -किसान योजनेची कोणी करायची या वरून वाद होता .त्यामुळे पात्र लाभार्त्यांना पीएम -किसान योजनेचा लाभ मिळणेस अडचणी येत होत्या .
पण आता ७ सप्टेंबर पर्यंत उपरोक्त लाभार्त्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक अर्थात ई-केवायसी करून घ्यावे , अन्यथा या लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही.
आपले मोबाईलवर Pmkisam पोर्टलवर हे लिंकीग करता येते तसेच सीएससी केंद्रावर जाऊन देखील पात्र शेतकऱ्यांनी पीएम -किसान योजनेसाठी आधार लिंक करु शकतात .आधार लिंकिंक मुदत ही ७ सप्टेंबर पर्यंत शासनाने दिली आहे . ई केवायसी केले नाही तर पुढील अनुदान हप्ता मिळणार नाही .तेव्हा ज्या शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खात्याला आधार लिंक केले नाही त्यांनी तात्काळ करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *