मुखेड: येथील ‘जिप्सी’ मॉर्निंग ग्रुपच्या अध्यक्षपदी संगणक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले, प्रा. जय श्रीकृष्ण जोशी यांची निवड संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी केली आहे.
आपले आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने निर्माण केलेल्या ‘जिप्सी’ मॉर्निंग ग्रुपने सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलेले आहे. यात रक्तदान शिबिरे, गोरगरीब गरजूंना मदत, पशु पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय, कुठल्याही सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून जिप्सी मॉर्निंग ग्रुपचा नावलौकिक झालेला आहे. प्रा. जय जोशी मागील ३० वर्षापासून मुखेड शहरात ‘जोशी इन्फोटेक’च्या माध्यमातून संगणक साक्षरतेचे धडे देण्याचे अमुल्य कार्यकरत आहेत. त्यांचे हजारो विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही वाकण्याजोगे आहे. या सर्व कार्याची नोंद घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी प्रा.जय श्रीकृष्ण जोशी यांना जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी जिप्सीचे माजी अध्यक्ष शेखर पाटील, कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे, सचिव बालाजी तलवारे, कोषाध्यक्ष वैजनाथ दमकुंडवार, प्रा. डॉ. स्वानंद मुखेडकर, डॉ. सतीश बच्चेवार, उत्तम अमृतवार, ज्ञानेश्वर डोईजड, नामदेव श्रीमंगले, भास्कर पवार, हनुमंत गुंडावार, उमाकांत डांगे, राजेश भागवतकर, सुरेश उत्तरवार, संतोष स्वामी, गोविंद जाधव,अरुण पत्तेवार, विठ्ठल बिडवई, डॉ. प्रकाश पांचाळ, धनंजय मुखेडकर, आकाश पोतदार, सागर चौधरी, सुरेंद्र गादेकर, श्रीकांत घोगरे, गिरीश देशपांडे, सतीश कोचरे, विठ्ठल मोरे, योगेश पाळेकर, गजानन मेहरकर यांची उपस्थिती होती. प्रा. जय जोशी यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.