कंधार ; दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सवा निमित्य भवानीनगर कंधार येथे भागवत कथा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले असून सजिव देखाव्यासह भागवत कथा व सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य दसरा उत्सव यात्रेचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन भवानी मंदिर ट्रस्ट भवानी नगर, कंधार च्या वतिने करण्यात आले आहे .
दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना करून कुंकूम अर्चनाचा कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे . तसेच दररोज सकाळी श्री बालाजी अभिषेक व श्री देवी अभिषेक होणार असून दररोज दुपारी १२ ते १ श्री बालाजी गंगाळे प्रसाद आणि दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत सजीव देखाव्या सहित भागवताचार्या, रामायणाचार्य सोनालीजी दीदी महाजन आळंदी (झी टॉकीत फेम) यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा व सायंकाळी ६ वा. श्री ची आरती, रात्री ७ ते ९ जोगवा व दांडीयाचा कार्यक्रम होणार आहे .
भागवत कथा आरतीचे यजमान शिवाजीराव पा. फाजगे व प्रा. एम. बी. बोकारे आहेत
दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत दसरा यात्रे निमित्य देश विदेशातील नाविन्यपूर्ण झुले, आकाशी पाळणे, ब्रेक डॉन्स झुला, डायनासोर ड्रेगन ट्रेन, मिकीमाऊस, इत्यादी आकर्षक विविध भरगच्च कार्यक्रमाने दसरा साजरा होणार आहे.
भागवत कथेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी इच्छुक कलाकारांना सहभाग घेण्यासाठी तात्काळ पांडुरंग रमाकांतराव मामडे व अॅड. प्रफुल मारोतराव शेंडगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .
भव्य दसरा उत्सव यात्रेसाठी प्रमुख सहभाग बाबुराव केंद्रे उमरगेकर ,मोहन रामराव मुत्तेपवार , भगवानराव कागणे ,सुभाष सुधाकरराव मुखेडकर , गणेश श्रीराम अमिलकंठवार , प्रदिप दिगंबर बिडवई ,शितल धोंडीबाराव भगत ,विकास नंदकिशोर बिडवई ,वैजनाथ केशवराव भोस्कर , ज्ञानेश्वर गोविंदराव बिडवई ,संतोष कुभांरगावे, बारशीकर महाराज, गोविंदराव गिते, उत्तमराव केंद्रे, शंकर पा. लुंगारे, बापुराव महाराज, नाथराव केंद्रे, वैजनाथ जक्कलवाड, सुरेशभाऊ राठोड, सुहास कांबळे, प्रदीप मंगनाळे, बालाजी बडवणे, सुरेश लक्ष्मण जोशी, दत्तात्रय एमेकर सर, रामकिशन प्रभु पातळे, शिरुळे एन.जे.चंद्र कांबळे, रमाकांत काशिनाथ भंडारवार, सचिन केशवराव जाधव, राज पा. इंगळे, हनमंतराव नागरगोजे, मोहित केंद्रे, योगेश कौसल्ये आदी चा प्रमुख सहभाग आहे .
सजिव देखाव्यासह भागवत कथा व सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य दसरा उत्सव यात्रेचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन भवानी मंदिर ट्रस्ट भवानी नगर चे अध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे ,उपाध्यक्ष : सूर्यकांत चालिकवार सचिव : व्यंकटराव संतुकराव जाधव पोलिस पाटील, कोषाध्यक्ष : नामदेव दिंगबर पटणे सदस्य : चंद्रकांत केरबा गंजेवार, विठ्ठल नामदेवराव लुंगारे, सौ. शोभाताई अरविंदराव नळगे यांनी केले .
दरम्यान श्री अभिषेक व गंगाळे नोंदणीसाठी मोहन मुत्तेपवार, विक्रम महाराज शास्त्री, शेषराव पा. नागरगोजे, गणपतराव पा. जाधव, भगवानराव शंकरराव जाधव, शंकरराव गिते,सुरेश महाराज व्यंकटेश केटर्स कंधार , अमोल अमिलकंठवार यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .
या भव्य दसरा उत्सवाची सांगता दि.०५ ऑक्टोंबर रोजी रंगी बेरंगी अतिषबाजी ने होणार अशी माहीती भवानी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष शहाजी नळगे यांनी दिली .