तहसिल कार्यालय ते कंधारचा ऐतिहासीक भुईकोट किल्ला दरम्यान होणार एकता दौड – तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

एकतेचा उत्सव-दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 साेमवार रोजी स.11.30 वा एकता दौडचे तहसील कडून आयोजन करण्यात आले .यामध्ये सर्व शिक्षक, शासकीय अधिकारी,कर्मचारी,कंधार तालुक्यातील नागरिक,युवा यांनी उत्साहात सहभागी व्हावे असे आवाहन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले .

भारताच्या स्वातंत्र्य लढयातील युद्धे व स्वतंत्र भारताचे पहीले उपपंतप्रधान मा.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस दिनांक 31 ऑक्टोंबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.सन 2022 च्या स्वातंत्र्य दिना निम्मित मा.पंतप्रधान यांनी घोषीत केलेल्या पंचप्राण संकल्पनेमध्ये एकता ही एक संकल्पना आहे.

मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या विचार व मूल्यांची जपवणूक करण्यासाठी राष्ट्रीय अमलबजावणी समितीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या छत्राखाली दिनांक 25 ते 31ऑक्टोंबर, 2022 हा कालावधी एकतेचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे व त्यामध्ये सर्वानी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

या निमित्ताने तहसील कायालयाकडून दि.31 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता एकतेचा उत्सव–एकता दौडचे आयोजन तहसिल कार्यालय कंधार ते कंधारचा ऐतिहासीक भुईकोट किल्ला दरम्यान केले आहे. यामध्ये सर्व शिक्षक,शासकीय अधिकारी,कर्मचारी व
नागरिक यांनी सहभागी व्हावे व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करावा असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने आयोजित या एकता संदेश दौड करीता मा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,मा श्रीमती ढालकरी (उ.जि.अ.सामान्य), मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार व्यंकटेश मुंडे हे तालुक्यातील सर्व कार्यालयाशी समन्वय ठेवून सर्वांना सहभागी करून ही एकता दौड यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पोलीस निरीक्षक कंधार
गटविकास अधिकारी मांजरमकर, मुख्याधिकारी दिवेकर, गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे, एकात्मीक महीला व बाल विकास अधिकारी कंधार रविंद्र चौहान यांच्या सहकार्याने याकामी नायब तहसीलदार संतोष कामठेकर,राजेश पाठक,नयना कुलकर्णी पेशकार अविनाश पानपट्टे,नि. समन्वयक मन्मथ थोटे गुरुजी,म.स.बारकुजी मोरे आदी प्रयत्नशील आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *