कंधार (प्रतिनिधी) – क्रांतीभवन बहादरपुरा मन्याड नदीवरील पूल शेवटच्या धोक्याची घंटा देत आहे. फुलावर मोठे-मोठे खड्डे पडून, वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत पुलावरून वाहने पार करावे लागत आहेत. त्यासाठी भविष्यात होणारा मोठा धोका सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच डाग दूंगी करून भविष्यात होणारा मोठा धोका टाळण्याची गरज असल्याचे वाहन चालकासह प्रवासी व पादचाऱ्यांकडून मागणी होत आहे, मात्रा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
असल्यामुळे या पुलावरून दुचाकी चारचाकी सह राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे .
जवळपास ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या सदरच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून काही संरक्षण पाईप तुटले आहेत. सध्या मानार प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरलेला असून धरणाच्या बॅक वॉटर मुळे पाणी पातळी पुलाबरोबर झाली आहे, तर पुलावरील स्ट्रेटलाईटचे पथदिव्य पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना समोरून मोठे वाहन येत असल्यास दुचाकीस्वतःलाच समोरचे काहीच दिसत नाही, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पुलावर पडलेले खट्टे तुटलेले संरक्षण पाईप बंद झालेले पथदिवे, पुलाच्या दोन्ही बाजूने मन्याड नदी काटोकाठ तुडुंब भरलेले पाणी या सर्व गोष्टीचा विचार करता हा फुल धोक्याचा इशारा देत आहे. त्यासाठी या पुलाला वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डागडूगी च्या उपचाराची अत्यंत गरज आहे. आसेही वहान चालकाकडुन बोलल्या जात आहे.