आज एका जिवलग व्यक्तीचा फोन
आला आणि नमस्कार केला..!
पुन्हा त्यांनी बोलताना म्हटले मग मोठ्या माणसांचे काय चाललंय की, मी त्यांना म्हटलं काहीच नाही हो पाटीमागे पाहिलं तर खूप दारिद्र आणि गरीबी आठवते, त्यांनी त्या गोष्टीला मला खूप चांगल्याप्रकारे उत्तर दिले. आज आपण संघर्ष करून स्वतःच अस्तित्व निर्माण केलात. गरीबीपासून मुक्त झालात पाटीमागे नक्कीच पहा पण त्या गोष्टीमध्ये विरंगळत राहू नका. गरिबीची जाणं ठेऊन आपल्या माणसांचा मान ठेऊन पुढील वाटचाल सुरु ठेवावं लागतं..!
समोर जाताना आपली सावली आपल्या सोबत असते. तेच आपण जर मागे जात असाल तर ती आपली सावली सुध्दा आपली साथ सोडते. म्हणून गेलेल्या गोष्टीची जाणं असावी परंतु त्यावर चिंतन करणं आपल्याला पाटीमागे घेऊन जाण्यासाठी तिला वेळ लागणार नाही..!
आपण जर आपल्या अंगावर नवीन नवीन कपडे घालून स्वतःला आनंददायी ठेऊन फिरवत असाल तर आपल्यावर ज्यांना मनापासून प्रेम, जिव्हाळा, माया, आपुलकी वाटते त्यांना आपण बरे वाटतो नाही तर ज्यांना आपण खटकतोय त्यांच्या मनात आपण जेंव्हा समोर आलो तेंव्हा मात्र नेहमीच खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी त्यांची प्रवृत्ती असते..!
म्हणून जसे आहात तसे तुम्ही खूप छान आहात. आमचा
जीव तुमच्यात आमच्यासाठी आयुष्यभर गुणवान आहात..!
′