कंधार – शिवसेना ही समाजकारणावर चालणारी संघटना आहे.शिवसेनाप्रमुखाच्या विचाराशी समरस होण्यासाठी गाव तिथे शाखा अन घर तिथे शिवसैनिक अशी उक्ती अवलंबण्यात यावी.जो पर्यंत शिवसेनाप्रमुखाचे विचार घराघरात पोहोचले तरच शिवसेना मजबूत होईल असे प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांनी ढाकुनाईक तांडा येथील शिवसेना शाखेचे नुतनीकरण करून फलकाचे अनावरण प्रसंगी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या जोमाने सुरू असलेली घोडदौड मशाल निशाणीची सुरू आहे. जिल्ह्यातील नव्या चिन्ह असलेला शाखाफलक अनावरन तालुक्यातील गणातांडा, ढाकुनाईक तांडा येथे शिवसेना शाखा पदाधिकार्यांची नेमणूक करण्यात आली. नुतन कार्यकारिणीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.तदनंतर ढाकुनाईक तांडा येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बालाजीराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कराळे, तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण, लोहा शहरप्रमुख गजानन करडे,युवासेना तालुकाप्रमुख धनजय बोरगावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रमुखांनी विचार मानले तद्नंतर बोलताना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे म्हणाले की.उध्दव बाळासाहेब ठाकरे एक विचार घेऊन चालणारी संघटना आहे.खोके घेऊन पक्षाची वाताहत करण्याचे मनसुबे करणाऱ्या गद्दारांना ठेचून काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मशाल ही निशाणीने आपली गद्दारांना शिक्षा देण्याची ताकद दाखवायची आहे.आज पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आहेत याचा आपणास अभिमान वाटतो.उध्दवजीनी ज्यांना ज्यांना मोठ केल. ते त्यांच्या वर पलटले पण तुमच्या सारखा तळागाळातील शिवसैनिक उध्दवजी च्यत्र पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.आज उध्दवजीना आपली गरज आहे त्यांना आता गेलेली सता शिवसैनिकास मुख्यमंत्री बनवून परत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.आज शिवसेनाप्रमुखाचे विचाराची गरज आहे.
त्यांचे विचार जागविण्यासाठी गाव तिथे शाखा अन घर तिथे शिवसैनिक झाले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आनंद राठोड यांनी व्यक्त केले.