स्वातंत्र्याच्या अम्रत महोत्सवी वर्षानिमित्त टाकळगाव ( ता लोहा जि नांदेड ) ग्रामपंचायतीने आज संध्याकाळी ०६ :०० वाजता निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. त्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन सरपंच भिमराव लामदाडे पाटील आणि पुसाप चे अध्यक्ष एन डी राठोड यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रत महोत्सवी वर्षानिमित्ताने टाकळगाव ( ता लोहा जिल्हा नांदेड ) ग्रामपंचायतीने आज रविवार दि १३ नोव्हें २२ रोजी निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.यात अहमदपूर येथील पुरोगामी साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे कवी निमंत्रित आहेत. संध्याकाळी ०६ : ०० वाजता पार पडणाऱ्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पु सा प चे संस्थापक अध्यक्ष एन डी राठोड असणार आहेत. सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यिक राजेंद्र कांबळे कविसंमेलनाचे उद्घाटन तर ई टीव्ही फेम गझलकार राजेसाहेब कदम सुत्रसंचालन करणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अरुण कदम पाटील, लोहा; धीरज पौळ, परभणी; आणि बळी आंबुलगेकर, नांदेड उपस्थित राहणार आहेत.
प्रा अनिल चवळे, बालाजी मुंडे, प्रफुल्ल धामणगावकर, वैजनाथ गित्ते,शिवा कराड, कवयित्री वर्षा माळी, मीना तौर, रंजना गायकवाड, मुरहारी कराड, शिवाजी नामपल्ले, विजय पवार , बाबाराव विश्वकर्मा टाकळगाव आणि प्रा भगवान आमलापुरे इत्यादी कविजन निमंत्रित आहेत. कविसंमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच भिमराव लामदाडे पाटील आणि पुसाप अध्यक्ष एन डी राठोड यांनी केले आहे.