शिक्षणगप्पा ; रंजीतसिंह डिसले
ग्लोबल टीचर अवार्ड नामांकनासाठी जगभरातून साडेबारा हजार शिक्षकांपैकी नामांकन दाखल केले असून त्यात रणजितसिह डिसले यांची टॉप फिफ्टी मध्ये समावेश आहे.
(उपेक्षित आणि वंचितांच्या प्रश्नांसाठी आग्रही राहणारे महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ज्ञ आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांनी सुरू केलेल्या महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांच्या ●शिक्षणगप्पा● या उपक्रमास सदीच्छा…)
सर,नमस्कार..
.” शिक्षण गप्पा” या कार्यक्रमासाठी खूप खूप आभाळभर शुभेच्छा आणि शुभकामना….
सर,
आपण सामान्य माणसाच्या वंचित आणि उपेक्षित घटकांच्या लेकरांसाठी गेली अनेक वर्ष अव्याहतपणे निष्ठेने परिश्रमित आहात याचा मला मला निश्चितच अभिमान गर्व वाटतो…सर,
आपण” शिक्षण गप्पा” हा नव्याने सुरू केलेला हा तुमचा उपक्रम निश्चितच महाराष्ट्रातील माझ्यासह अनेक नवं काहीतरी करायला उभं टाकलेल्या शिक्षकांना प्रेरणा देणारा उपक्रम आहे.सर,
आपण” शिक्षण गप्पा” या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक उपक्रमशील शिक्षकांना सादर करून त्याच्या कामाची या गप्पांमधून ओळख करून देत आहात.
अशा उपक्रमशील शिक्षकांच्या अनेक उपक्रमाची दखल आणि प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक अधिक गतीने आणि विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक आणि निष्ठेने प्रयत्न करतील यात मला शंका वाटत नाही. सर,
महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर नेऊन महाराष्ट्रातील शिक्षकही तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे नाहीत हा संदेश रंजीतसिंह डिसले या प्रज्ञा संपन्न शिक्षकाच्या माध्यमातून आपण दाखवून दिला आहे. मी सुरुवातीलाच रणजीतसिंह डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो…..
एका सामान्य परिवारातला कर्मयोगी जागतिक पातळीवर” ग्लोबल टीचर आवार्ड” इथपर्यंत जाऊन पोहोचतो हे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे असे मला वाटते.
ग्लोबल टीचर अवार्ड या नामांकनासाठी जगभरातून साडेबारा हजार शिक्षकांनी नामांकन दाखल केले असून त्यात रणजितसिह यांची टॉप फिफ्टी मध्ये निवड होणे खर्या अर्थाने त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक आणि पाठीवरची थाप आहे असे मला वाटते.
तंत्रज्ञानाचा वापर करून रणजीतसिंह यांनी जग हीच माझी शाळा आहे ही भावना मनात घेऊन तंत्रज्ञानाला सोबत जोडून १७० देशातील शिक्षकांसोबत ते सातत्याने आजही संवादित आहेत हे ऐकून मला खूप आनंद वाटला.
आर्य चाणक्याचे हे विधान या अर्थाने मला खूप महत्त्वाचे वाटते” शिक्षक कभी सामान्य नही होता, सृजन उसकी गोद मे पडती है !! आर्य चाणक्याचे हे विधान रणजीतसिंह यांनी प्रत्यक्षात खरे करून दाखवले आहे. सर ,
तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना जग वर्गात आणून उभं करता येतं हेही रणजितसिंह यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. माणूस चुकत चुकत शिकत असतो तो चुकत चुकत शिकला हीच खऱ्या अर्थाने चांगल्या शिक्षणाची नांदी आहे असे मला वाटते.
रणजीतसिंह यांनी ८३ देशातील १५३१ शाळा मधून ८६ हजार ५१३ विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन केले असल्याचे या गप्पांमधून ऐकून मला खूप समाधान वाटले आहे.
रणजितसिंह यांनी आशिया खंडातील अनेक देशात आणि जगातील विशेषत्वाने अमेरिका आशिया या देशात त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांच्या ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग केला आहे. याचे मला कौतुक वाटते.
भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे हा विचार मनात घेऊन स्वतःच्या गतीने स्वतःला शिकविण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनात ठेवून रणजितसिह यांनी हाती घेतलेला हा प्रयोग, उपक्रम मला खूप प्रेरणादायी वाटतो. सर,
आपण महाराष्ट्रातील अशा उपक्रमशील आणि आपल्या कर्तव्याला प्रती निष्ठा असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांसाठी रात्रीचा दिवस करून गुणवत्तावाढीसाठी आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या अशा प्रज्ञा आणि प्रतिभा संपन्न शिक्षकांना तुम्ही सादर करत याचा मला मनापासून आनंद झाला आहे. सर,
अशा उपक्रमशील शिक्षकांचे अनेक उपक्रमाचे हे प्रसारण आपण वाटण्याची भूमिका घेऊन पुढे चालत आहात तुमच्या त्या चालणाऱ्या पवित्र पावना विनम्र अभिवादन…
सर मला माहित आहे आपण अशा लेकरांसाठी काम करता की जिथे अजूनही शिक्षण केलं नाही त्या झोपडीतल्या लेकरांना शिक्षणासाठी शिक्षणातून प्रकाश मिळावा, झोपडीतला अंधार दूर व्हावा आणि ती अंधारमय असलेली झोपडी उजेडात तेजोमय व्हावी यासाठीचे तुमचे प्रयत्न मला अधिक मोलाचे वाटतात..सर,
तुमच्या या उपक्रमाला मी मनापासून सलाम करतो…रंजीतसिंह डिसले यांच्या कार्य आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा करून त्यांचे मनापासून अभिनंदन करतो…. आणि थांबतो…..धन्यवाद..
● शिवा कांबळे,नांदेड ●
(राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक)
भ्रमणध्वनी:९४२२८७२७२१