(कंधार प्रतीनीधी )
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय उमरजचे ग्रामसेवक डी.जी.देवकत्ते यांच्या बदलीचा आदेश निघून एक महीण्याच्या जवळपास कालावधी होऊन सुध्दा नवीन ग्रामसेवकास पदभार देण्यास टाळाटाळ करत आसल्यामुळे ग्रामपंचायत उमरजच्या वतीने उपोषणाचा ईशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे .
दिनांक 20 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत उमरच्या वातीने गटविकास अधीकारी कंधार यांना देण्यात आलेल्या निवेदनात आसे नमुद करण्यात आलाले आहे कि दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संबंधित कार्यालयातुन ग्रामसेवक एस .एस.विस्वासराव यांची नेमणुक करुन ग्रामसेवक डि.जी.देवकत्ते यांना श्री विस्वासराव यांच्याकडे कार्यभार सुपुर्द करण्याचा आदेश पारीत करण्यात येऊन सुध्दा संबधीत देवकत्ते ग्रामसेवक हा पदभार सोडण्यास टाळाटाळ करुन उमरज ग्रामपंचायत अतर्गत बेकायदेशीर रीत्या आर्थिक कामे चालुच ठेवुन प्रशासनाची व ग्रामपंचायत ची दिशाभुल करुन सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत.
सद्य स्थितीत नवीन ग्रामसेवकास पदभार दिला नसल्यामुळे पहीले ग्रामसेवक देवकत्ते हे आपला मोबाइल बंद ठेवुन भुमिगत झालेले आसल्यामुळे गावामधील पुढील विकास कामांसह सर्व सामान्य नागरीकांचे कामे स्थगीत आहेत .
तरी ग्रामसेवक डि.जि.देवकत्ते यांनी त्वरीत पदभार द्यावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय उमरजच्या वतीने उपोषणास बसण्यात येईल असा ईशारा निवेदना द्वारे सरपंच , उपसरपंचासह गावकर्यांनी
दिले असुन या निवेदच्या प्रती नांदेड जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर व मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांना देण्यात आलेल्या आहेत .