कंधार ; प्रतिनिधी
ग्रंथालयाचे व्यवस्थापना विषयी माहिती घेण्यासाठी कंधारच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास आज दि.२७ फेब्रुवारी रोजी हुजूर साहेब सार्वजनिक वाचनालय सचखंड बोर्ड नांदेड ग्रंथालयाचे ग्रंथपाल ग्रंथपाल बबीता कौर व त्यांचे सहायक यांनी भेट दिली. त्यावेळी सर्व वाचनालायाचे व्यवस्थापन असल्याचे माहिती त्यांनी दिली .
व्यवस्थापना विषयी आदर्श असलेले मराठवाड्यातील एकमेव वाचनालय म्हणून नावाजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार हे प्रसिद्ध वाचनालय आहे. सदरील ग्रंथालयाचे व्यवस्थापना विषयी माहिती घेण्यासाठी हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा बोर्ड सार्वजनिक वाचनालय नांदेड येथील कर्मचारी वाचनालयास भेट देण्यासाठी आले असता, सर्वप्रथम मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी ग्रंथालयातर्फे हुजुर साहिब सचखंड गुरुद्वारा बोर्ड सार्वजनिक नांदेड ग्रंथालयाचे ग्रंथपाल बबीता कौर मॅडम व त्यांचे सहकाऱ्यांचे शाल पुष्पहार देऊन सत्कार केले.
मोहम्मद रफीक सत्तार यांनी ग्रंथालय विषयी सविस्तर माहिती दिली.तसेच सदरील ग्रंथालय हे सर्व सुविधायुक्त असल्या मागचे कारण ही त्यांनी सांगितले की ग्रंथालयसाठी अनुपसिंह यादव प्रशासक व कारभारी दिवेकर मुख्य अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहाय्य असून. तसेच या अगोदरील मुख्याधिकारी, अध्यक्ष, नगरसेवक यांच्या साह्य लाभल्याने सदरील ग्रंथालय हे प्रसिद्ध आहे.
आज दिलेल्या भेटीत सदरील ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांनी येथील व्यवस्थापन अभ्यासिका पाहून फार समाधान व्यक्त केले. यावेळी वाचनालयाचे कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, श्रीमती कमलबाई जाधव, उपस्थित होते.