कंधार
ऐतिहासिक कंधार शहराच्या वायव्य दिशेला मानसपुरी शिवारातील मुंबादेवी परीसरात 1985 साली क्षेत्रपाल वास्तुपुरुषाची विशालकाय 65/70 फुट मुर्तीचे भग्नावशेष सापडले .
तत्कालीन आमदार कंधार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी त्या भागाचे उत्खनन करण्यासाठी शासन दरबारात आवाज उठविला आणि त्या जागेचे उत्खनन करुन ती जागा शासनाने अधिग्रहण केले.ती सापडलेली भग्नावशेष कंधारच्या ऐतिहासिक राष्ट्रकूट कालीन भुईकोट किल्ल्यात उघड्यावर ठेवली आहेत.
किल्ल्याच्या विकासासाठी कोट्यांशी रुपये शासनाकडून मिळाले खरे पण ही विशालकाय मुर्तीचे भग्नावशेष आपल्यापासून वंचित आहेत. वर्षानुवर्ष वारा,ऊन,पाऊस, थंडीची मार झेलत जिर्ण होण्याच्या अवस्थेत आहेत.म्हणून शासनाने याकडे लक्ष वेधून हा ऐतिहासिक मुर्ती कलेच्या भग्नावशेषाचे जतन करणे ही काळाची गरज आहे.
करोडो रुपये खर्च होऊन त्यात खारीचा खर्च माझ्या वाट्यास आलाच नाही.म्हणून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर,गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी क्षेत्रपाल विशालकाय मुर्तीच्या भावनेला शब्दबिंबातून वाचा फोडण्याचा अल्पसा प्रयत्न