गाव छोटं आहे की मोठ ? हे महत्त्वाचे नसून गावातील विकासाभिमुख विविध समस्या सोडवून घेण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येतात हे महत्वाचं — सौ.आशाताई शिंदे

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

गाव छोटं आहे की मोठं आहे ? हे महत्त्वाचं नसून त्या गावातील लोकही एकोप्याने राहून गावाच्या विकासासाठी व गावातील विविध विकासाभिमुख समस्या सोडून घेण्यासाठी प्रयत्न करत ग्रामस्थांनी एकत्र येणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे, असं शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोमसवाडी येथील आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतेवेळी बोलून दाखविले.

गुरुवार दि.१६ मार्च २०२३ रोजी फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत असल्यास सोमसवाडी येथील शिवजन्मोत्सव व आमदार शिंदे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या १० लक्ष रुपयांच्या बांधण्यात आलेल्या सीसी रोडचा लोकार्पण सोहळा निमित्त आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलवळच्या सरपंच सौ.विमलबाई नागनाथ मंगनाळे, तर लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटक तथा मुख्य सत्कारमूर्ती म्हणून सौ.आशाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पुढे बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, सोमसवाडी हे छोटं गाव असून येथील लोकसंख्या खूप कमी आहे. परंतु या गावात एकीचे बळ असल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येते. येथे एकमेकांविषयी मतभेद किंवा हेवा- दावा असल्याचे दिसून आले नाही, तर गावातील विविध विकासकामे करून घेण्यासाठी येथील मंडळी एकत्र येतात, ही अभिमानाची बाब आहे आणि या गावातील लोकांचा आदर्श इतर गावातील लोकांनी घेणं अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गावात हेवे-दावे व एकमेकांबाबतचे मतभेद असतील तर गावचा विकास खुंटतो, याचा विचार होणं पण गरजेचा आहे. जो कोणी लोकप्रतिनिधी गावातील सार्वजनिक अडचणी सोडविण्यासंदर्भात वेळप्रसंगी धावून येऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करत असेल व निधीची उपलब्धता करून देत असेल तर अशा लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभे राहणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या.

 

यावेळी सचिन कुदळकर, शेख शेरूभाई यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आशाताई शिंदे यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर १० लक्ष रुपयाच्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सीसी रोडच्या फलकाची फीत कापून लोकार्पण करण्यात आले.
सोमसवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख मान्यवरांना शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी देवकांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन विश्वांभर बसवंते यांनी केले. उपस्थांचे आभार संयोजक शिवाजी सोमासे यांनी मांडले.

 

यावेळी कोंडीबा मोरे, माधव घोरबांड, अवधूत पेटकर, हनुमंत जाधव, मगदूम शेख, प्रवीण मंगनाळे, श्रीकांत मंगनाळे, वसंत मंगनाळे, नागनाथ मंगनाळे, नागेश गोधने, सदाशिव पटणे, नवनाथ बनसोडे, गणेश जाधव, महेश पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी शिवाजी सोमासे, दत्ता शिंदे, शिवदास सोमासे, संभाजी सोमासे, वामन शिंदे, बालाजी थाटे, उत्तम सूर्यवंशी, माधव सोमासे व नारायण सोमासे यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *