के.चंद्रशेखरराव यांची लोहा येथील सभा यशस्वी …! शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी मानले सर्वांचे जाहीर आभार

लोहा ; अंतेश्वर कागणे

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांची लोहा येथिल बैल बाजार येथे झालेली सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी चळवळीतील कार्यकर्ते , तरुणमंडळी महीला , शेतकरी ,सर्वसामान्य नागरीकासह माध्यमांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी आज सर्वांचे जाहीर आभार मानले .

दिनांक 26 मार्च रोजी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांची लोहा येथील जाहीर सभा व पक्ष प्रवेशाचे जाहीर आवहान व निमंत्रण भारतराष्ट्र समिती व शंकर अण्णा धोंडगे यांच्याकडून दिल्या गेले होते. त्या आवहानाला व निमंत्रणाला लोहा – कंधार तालूक्यातून नांदेड जिल्हयातून राज्यभरातील विवीध क्षेत्रातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व तमाम शेतकरी बांधव, मायाबहीणी व विषेशतः तरुण मित्रांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला सोबतच पत्रकार मित्र इलेक्ट्रानिक मिडीया व सोशल मिडीयानेही राज्यात व राज्याबाहेर देशभर मोठी प्रसीध्दी देउन बळीराज्याच व गोर गरीब कष्टक-याचा आवाज मोठा करण्यासाठी सहकार्य केले. सतत दोन आठवडे गांवा गांवातील कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतल्याने ही सभा ऐतिहासीक झाली. तेलंगाणातील भारत राष्ट्र समितीचे आमचे सहकारी यांनीही रात्र न दिवस मेहनत घेतली. शेतकरी चळवळीतील राज्यभरातील मागील 30 वर्षापासुनचे माझे सहकारी नेत्यांनी व कार्यकत्यांनी आपली हाजेरी लावून माझ्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या बद्दल शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *