कंधार ग्रामीण रुग्णालयात “जागतिक परिचारिका दिन” उत्साहात साजरा

कंधार ; प्रतिनिधी

आज दिनांक :-12/05/2023 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक परिचर्या दिन साजरा करण्यात आला.

 

आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा ग्रामीण रुग्णालयातील अधीपरिचारिका श्रीमती.राजश्री इनामदार व शीतल कदम यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार कॅन्डल ओथ लावून अभिवादन करण्यात आले.

श्रीमती.राजश्री इनामदार अधिपरिचारिका यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले सर, यांच्या हस्ते सर्व परिचारिका यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णुकुमार केंद्रे यांनी केले तसेच यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी श्री.विष्णुकुमार केंद्रे, श्री. प्रशांत कुमठेकर,
श्रीमती. आऊबाई भुरके,श्रीमती.अनिता तेलंगे, श्रीमती.अश्विनी जाभाडे, श्रीमती सुरेखा मैलारे, श्रीमती. मयुरी रासवंते ,शिल्पा केळकर,पल्लवी सोनकांबळे,संगम वाघमारे,आणि सर्व परिचारिका विद्यार्थीनी तसेच श्री. प्रदीपकुमार पांचाळ, श्री.राजेंद्र वाघमारे,अशोक दुरपडे, गणेश गरडे.
डॉ.महेश पोकले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कर्मचारी वर्ग यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. परिचारिका दिनानिमित्त सर्व भगिणीस 108 चे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराज यवलीकर व त्यांचे वाहनचालक संभाजी मोकले,सोपान लाडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सर्वपरिचारिकाना मानाचा मुजरा,नतमस्तक…व परिचारिका दिनाच्या सर्वाना शुभेच्छा. व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विष्णुकुमार केंद्रे यांनी केले आणि उपस्थित सर्व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *