साहसी निर्भिड बाण्याचा क्रांतीकारी बिरसा मुंडा…

 

आपणा सर्वांना चंद्रशेखर आझाद,राजगुरु,भगतसिंग यांचा इतिहास माहित आहे.पण…साहसी निर्भिड बाण्याच्या बिरसा मुंडा यांचा इतिहास खूप कमी जणांना माहित आहे.त्यांनी अदिवासीसमाजाच्या उध्दारासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले.१५नोव्हेंबर १८७५ मध्ये महानायक बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मध्ये लिहतू या गावी एका झोपडीत झाला.

 

त्यांची मुंडा जाती बिरहकुल कुटूंबातील होती.मुंडा प्रथानुनार त्याचे नाव बिरसा ठेवले गेले.सुगना मुंडा आणि करमी हातू यांचे ते पुत्र होते.आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.१९व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासीव्दारा इंग्रजसरकारविरोधात जे जनआंदोलन केले एक चळवळ उभी केली या चळवळीला ‘उलगुलान’असे म्हणत. त्याचे नेतृत्व क्रांतीकारक बिरसा मुंडा यांनी केले होते.इंग्रजाच्या जाचक बंधनाचा त्यांनी कडाडून विरोध केला.त्यांचा आवाज फार भारदस्त होता.त्यांचे लहापण रानातच गाई गुरे चारण्यात गेले.

 

त्यामूळे निसर्गातील ब-याच वनऔषधी त्यांना ज्ञात होत्या.बिरसा मुंडा यांच्या घरची परीस्थीती खूपच हालाखीची होती त्यामूळे त्यांना त्यांच्या मामाच्या घरी अयुभातु या गावी पाठविण्यात आले ते आभ्यासात खूपच हूशार होते.बिरसा यांनी विद्रोह पारंपारिक भूव्यवस्था बदलण्यासाठी केला होता.त्यांनी ब्रिटिश सत्तेला नाकारले आणि आपल्या अनुयायांनी सरकारला कर न देण्याचा आदेश दिला.त्यांना “धरती बाबा”म्हणून देखिल ओळखले जायाचे.ज्यावेळी १८९४ते १९००दरम्यान मुंडा समुदाय आणि ब्रिटिश सैनिकांमध्ये युध्द होत राहिले त्यावेळी बिरसा यांनी इंग्रजांना सळोकी पळो करुन सोडले होते.जल,जमीन ही संपत्ती आमचा अधिकार आहे.ते आमच्या उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे.न्याय व अधिकारप्राप्तीसाठी त्यांनी त्यांच्याकडे कुठलाच शस्त्रसाठा उपलब्ध नसतांना केवळ धनुष्याला आपले शस्त्र बनवत पोलिस स्टेशनवर त्यांनी हल्लाचढवला.

 

१८९८मध्ये तांगा नदीच्या किनारी मुंडा आणि इंग्रज सैनिकामध्ये युध्द झाले.त्यावेळी ब्रिटिश सैनिकांना बिरसा यांच्या पुढे हार मानावी लागली.ब्रिटिशांना अगदि सळोकीपळो करुन सोडणा-या बिरसा यांना १९००च्या शतकात अटक करण्यात आली त्यावेळी ते एका जनसभेला संबोधित करत होते.डोमबाडी पाहाडावर यावेळी इंग्रज सैनिक आणि त्यांच्यात संघर्ष झाला त्यावेळी असंख्य महिला आणि लहानमुले यात मारली गेली.अनेक अनुयांयाना अटक करण्यात आली. ३ फेब्रुवारी १९००मध्ये चक्रधरपूरमध्ये त्यांना इंग्रजांनी अटक केले.या काळात त्यांचा मृत्यू झाला.त्यांना ब्रिटिशांनी विष देऊन मारल्याचा अंदाज वर्तवीला जातो.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींच्या स्वातंत्र्यसंग्रामास इतिहासात सूवर्णअक्षरांनी कोरले गेले.

 

महाश्वेतादेवी यांनी बिरसा मुंडा यांच्या विद्रोहावर “अरण्य अधिकारी”नावाची कांदबरी लिहिली आहे.
 ९ जून बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन.

 

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *