मी 19 वर्षांची आहे मला अनेक तरुणांचे prapose येतात परंतु मला अशा गोष्टी पहिल्यापासूनच आवडत नव्हत्या आणि मला माझ्या अभ्यासातून अशा गोष्टींना वेळ सुद्धा नसायचा परंतु आता मला 40 वर्षाच्या पुरुषावर प्रेम झाले मी त्याच्या भावनांमध्ये पूर्ण गुंतलेले आहे त्यांचं लग्न झाले आहे…. आणि ते सुद्धा माझ्या मते शारीरिक दृष्ट्या नव्हे तर भावनिक दृष्ट्या खूप गुंतलेले आहेत मला वाटतं ते सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत असावे खरंच यावे त्यांना प्रेम होत असेल का आणि मी एवढ्या मोठ्या पुरुषाच्या प्रेमात पडण्याच कारण काय असावं…
…. Bunch of Imotions..
वरचा मेसेज माझ्या वाचक मुलीचा आहे.. तसाच्या तसा कॉपी पेस्ट केलाय..खरं तर हा मेसेज वाचुन मी घाबरले कारण मलाही २२ वर्षाची मुलगी आहे.. या मेसेजला लेखिका पेक्षा आई आणि मैत्रीण म्हणून जमेल तसं उत्तर द्यायचा प्रयत्न करते.. तुम्ही सगळ्यानी जरुर व्यक्त व्हा..
सगळ्यात आधी या वयात शिक्षण आणि करीअर यावर लक्ष द्यावं ,वाचन छंद यात मन रमवलं तर वेगळ्या गोष्टी समोर येत नाहीत.. आईने मुलीसमोर हंटर घेउन उभं न रहाता मैत्रीण होवुन या वयात काय काय मनात येउ शकतं याबाबत तिच्याशी बोलावं.. त्या वयात आपणही होतो,,तेव्हाही आपल्याला असच काहीतरी झालं असेल हेही तिला समजुन सांगता यायला हवं..
या वयात कोणीतरी आपली काळजी घेतय , गिफ्ट देतय ,ड्रेस देतय ,किवा मिठीत घेतोय , तो स्पर्श , सहवास , या सगळ्याला या वयातील मुलं प्रेम समजतात पण बऱ्याचअंशी ते आकर्षण असतं.. प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजुन सांगा.. अशा वेळी मुलीनी भावनेच्या आहारी जाऊन आपलं सुंदर शरीर दुसऱ्याच्या हातात देउ नये.. तो शरीरापलिकडे प्रेम करतो का हे पहावं आणि ४० शीतील पुरुषाने अशा मुलीना वडीलांच्या नात्याने समजुन सांगावे त्यांच्या वयाचा गैरफायदा घेउ नये कारण त्यांच्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडली तर याचा विचार करावा.तिला समजत नाही पण आपल्याला कळतय हा विचार त्या पुरुषांने करावा .. त्या मुलीचं संपूर्ण आयुष्य जायचं आहे आणि पुढे जाऊन तिला तिच्या नवऱ्याबद्दल ( सगळे पुरूष असेच असतात ) ही भावना यायला नको.. त्यामुळे सय्यम हवाच.. स्त्री पुरुष निसर्गाचा बॅलन्स आहे तो दोघानीही जपायला हवा.. एका छोट्या मोहापायी अनेकांचं नुकसान होवु शकतं..
आपण म्हणतो प्रेम कधीही कोणावरही होवु शकतं पण मेंदु आणि मन याचा बॅलन्स साधता आला तर सगळं सावरणं सहज शक्य आहे.. या वयात प्रेम हे आपले आई वडील ,आजीआजोबा ,,भाऊ बहीण ,गुरु , निसर्ग ,पुस्तके यावर करावे आणि योग्य वयात जोडीदारावर करावं.. खूप मोठा विषय आहे. विभक्त कुटुंब पध्दतीने खुप नुकसान होतय हे खरं आहे.. मोबाईल आणि त्याच वयातील चुकीची संगत ,व्यसनं यापासून मुलांना दुर ठेवायचं असेल तर पुस्तकाना जवळ करा.. आणि घरात संवाद ठेवा.. लैगिकतेवर मुलांशी बोला. त्यातील फायदे तोटे समजावुन सांगा..
आजचा लेख लिहीणं मलाही जड गेलय ..सेंसेटीव्ह वुमन , आई , मैत्रीण आणि लेखिका यांच्या मिश्र भावना म्हणजेच माझ्या छोट्या वाचकाला दिलेलं हे उत्तर आहे..मला वाटतं जास्तीत जास्त वाचकांनी हा शेअर करा आणि वयात येणाऱ्या मुलींकडे डोळ्यात तेल घालुन लक्ष द्या.. जिने हा मला मेसेज केलाय ती यातुन सावरावी हाच उद्देश.. आणि हे वाचुन इतर मुलीही सावध होतील.. आता घेतलेली काळजी संपूर्ण आयुष्य सुंदर करु शकते..
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री