अर्धवट व खराब रस्ताने घेतला एकाचा जीव..;बसच्या दरवाज्याचे हुक तुटले खाली पडून एकाचा मृत्यू 

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील आंबुलगा शेल्लाळी जवळ मुखेड डेपोची बस क्र गाडी क्रमांक एम एच 20 , बी एल 1618  हे आज ता. २० जून रोजी सकाळी कंधारहुन मुखेडकडे जात असतांना या बस मधुन प्रवास करणारे कल्हाळी ता.कंधार येथील लक्ष्मण शेषेराव गायकवाड वय ४० वर्ष हा मुखेड गाडीने सावरगाव येथे सासरवाडीकडे जात होते पण खराब रस्तामुळे या बसच्या दाराचे हुक तुटल्याने व बस भरगच्च भरलेली असल्याने लक्ष्मण गायकवाड हे दारात उभा होते पण दरवाज्याचे हुक तुटले आणि ते बस बाहेर खाली पडले व जागीच त्यांचा मत्यु झाला.

 

सदर रस्ता हा राज्य महामार्ग असून कंधार वरून मुखेड ला जातो. हा रस्ता जवळपास मजबुतीकरन व डांबरीकरन झालेले आहे पण वनविभागामुळे आंबुलगा – शेल्लाळी पर्यतचा रस्ता बांधकाम विभाग व वनविभागाच्या वादात अडकल्याने हे तिन वर्षापासुन रस्त्याचे काम जवळपास एक , दोन कि.मी. चे काम अद्याप झाले नसल्याने ही घटना घडली असे बोलले जात आहे.

माजी सभापती पंडीत देवकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता यांनी सांगितले की वनविभागाच्या वादात अडकल्यामुळे या रस्ताचे काम तिन वर्षा पासुन रखडले आहे. या अगोदरही बरेच अपघात येथे झाले असून याची दखल कोणतेही वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित विभाग दाखल घेत नसल्याचे ही त्यांनी सागितले.

सरपंच सावरगाव :- धोडिंबा ताटे यांनी सांगितले की , मी संबधीत अधिकारी व एजन्सी यांना या रस्तासाठी भेटलो पण काहीच उपयोग झाला नाही बांधकाम विभागाकडे गेलो असता ते वनविभागाने हा रस्ता अडवला आहे तुम्ही गडकरीकडे जा असे उत्तर देतात या दोघाच्या वादात मात्र येथे अनेकाचे जिव जातात असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *