मानवी जीवनात योगाचे महत्त्व ; 21 जुन जागतिक योग दिन

योग हा शब्द संस्कृत भाषेतील ” युज ” या मूळ धातूपासून बनलेला असून युज याचा अर्थ ” जोडणे एकत्र आणणे होय.” योग म्हणजे ” जीवात्मा व परमात्मा यांचे मिलन होय.” पतंजली ऋषींनी योगदर्शन मध्ये
” योगश्चितवृत्तीनिरोधः || ” अशी व्याख्या केलेली आहे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात
” समत्वं योग उच्यते ” व ” योग कर्मसू कौशल्यं ” आपल्या कर्मातील कुशलता म्हणजे योग होय .आधुनिक युगात नवीन एक व्याख्या केलेली आहे ती म्हणजे !
” सबबी सोडून आरोग्यासाठी वेळ काढणे होय. “

यम ,नियम, आसन,प्राणायाम ,प्रत्याहार ,धारणा ,ध्यान व समाधी
हे योगाचे आठ अंग आहेत.अष्टांग योग्य असा मार्ग आहे ज्या मार्गावर प्रत्येक व्यक्ती चालू शकतो. मानवी जीवनामध्ये सुख, शांती आनंद प्राप्त होण्यासाठी योग फार महत्त्वाची भूमिका बजावतो .योग हे मत, पंथ ,संप्रदाय नाही तर हे ” आदर्श जीवन जगण्याची कला आहे.” सातत्याने योग केल्यास वैयक्तिक, सामाजिक ,शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य प्राप्त होते, आणि आत्मिक शांतीचे अनुभूती मिळते.उदा.ज्या प्रकारे मुल आणि आई, मोबाईल व चार्जरचा जसा घनिष्ठ संबंध आहे तसाच योग आणि शरीराचा निश्चित संबंध आहे.

” शरीरमं आद्यं खलू धर्मसाधनम्
शरीर संपदे व्यायाम आवश्यक “

शरीराच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी करतो मग त्याचे स्वास्थ्य राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .माणूस कोणत्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा असला तरी त्याला निरोगी निरामयतेसाठी योग आवश्यक आहे.

” धर्मार्थ काममोक्षाणां आरोग्यं मूलमुत्तमम् ” वरील श्लोकातील धर्म, अर्थ ,काम ,मोक्ष साधण्यासाठी व पुरुषार्थ करण्यासाठी योग आवश्यक आहे.

तसेच आहार आणि आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे. त्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे .” आरोग्य हे जीवनाचे साध्य नसून साधन आहे. “
ते साधन निरोगी राहणे यासाठी योग आवश्यक आहे. योग सातत्याने केल्यानंतर माणूस रोगमुक्त होऊन आरोग्य संपन्न जीवन जगू शकतो. योगामुळे मनाची एकाग्रता वाढते,माणूस व्यसनमुक्त होतो, स्वभावात बदल होऊन नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार प्रदान होतात.
” 21 शतक हे ताणतणावाचे शतक आहे.” ताणतणाव सहन करण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे.

त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यावर ” योग ” हाच एकमेव इलाज आहे. हृदयविकार, आम्लपित्त ,मधुमेह .लठ्ठपणा, पक्षाघात असे असाध्य रोग बरे होतात.

अष्टचक्र –
मूलाधार चक्र ,स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र ,अनाहत चक्र,विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र चक्र व सहस्त्रार चक्र

नऊ द्वार –
दोन डोळे ,दोन कान, दोन नाकपुड्या ,एक तोंड ,एक शिश्न / योनी व गुदद्वार

72 कोटी 72 लाख 10 हजार 210 नसणाऱ्या परिशुद्ध होतात.
धमण्यात आलेले अवरोध दूर होतात. अंतस्रावी ग्रंथी संतुलित होतात.

त्रिदोष [ वात,पित्त,कफ ] समान होतात.

पंचकोष-
अन्नमय कोष- पचन संस्थे संदर्भात
प्राणमय कोष- शरीरातील घाण पदार्थ बाहेर काढणे.

मनोमय कोष मन बुद्धी अहंकार चित्त नाहीसे होतात.

विज्ञानमय कोष- बुद्धी संदर्भात

आनंदमय कोष-
हृदयामध्ये.

शरीरातील सर्व संस्था-
रक्ताभिसरण संस्था श्वसनसंस्था,पचन संस्था
उत्सर्जित संस्था ,चेतासंस्था किंवा मज्जासंस्था, पुनरुत्पादन किंवा जननसंस्था
अस्थिसंस्था ,स्नायू संस्था

सप्त धातू-
रस,रक्त,मांस,मेद,अस्थी,
मज्जा,पुरूषामध्ये शुक्र /स्त्रीयामध्ये आर्तव.

आठवे ओज ओज हे सप्तधातूचे सत्व आहे.
देहाचे ,मनाचे आरोग्य व शरीराची रोग प्रतिकारशक्ती या धातुवर अवलंबून असते.
अन्नापासून सर्व धातू निर्माण होत असल्याने अन्नाच्या गुणवत्तेवर या धातूचे स्वरूप अवलंबून असते.

 

आपल्या शरीरातील वरील सांगितलेले सर्व योग प्राणायामाद्वारे परिशुद्ध होऊन निरोगी निरामय आरोग्य संपन्न जीवन जगता येते.

अर्थात

सब रोगोंकी एक दवाई

प्राणायाम करो मेरे भाई

शालेय विद्यार्थ्यांमध्ये हृदयरोग ,मधुमेह, ताणतणाव यासारखे रोग होत आहेत. त्यासाठी शाळेत ” लैंगिक शिक्षणाऐवजी योग शिक्षण देण्याची काळाची गरज आहे.” भारत हा जगातील सर्वात तरूण देश आहे. कारण पासष्ट टक्के तरूण या देशात राहतात.आणि उद्याचे भविष्य हे तरूण आहेत .म्हणून शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य विषय म्हणून योगाचा समावेश करावा. योगामुळे देशातील बालक तरुणांच्या शारीरिक ,मानसिक ,बौद्धिक चारित्र्य विकास होऊन एक अभिनव भारत निर्माण करणे शक्य होईल. योगसाधनेमुळे बालकांच्या मनात आई-वडील, गुरुजन व वडीलधाऱ्या व्यक्तीप्रती आदर व राष्ट्राप्रती स्वाभिमान जागृत होऊन देश प्रगती पथावर जाण्यास हातभार लागेल.

आजचे गतीशील जीवन दिशाहीन होत चालले आहे .त्यामुळे अनेक जणांची ताणतणावामूळे दुर्दशा होत चाललेली आहे. अशा दुर्दशा आणि दिशाहीन अवस्थेत एकमेव अशा आणि दिशा ती योगाची आहे. म्हणून ” योग ही सुखी जीवनातील कामधेनु आहे ” जीवन जगण्याची कला आहे.आज मोठ्या प्रमाणात युवक नशा, वासनारूपी भयंकर अशा विळख्यात सापडलेला आहे. परिणामी देशाचे तारुण्य वाया जात आहे. त्या युवाधनाला राष्ट्र निर्माण व विकासाकडे वळविण्याचे काम योग करू शकतो. युवकांमध्ये प्रचंड बल, शक्ती, पराक्रम ,शौर्य व स्वाभिमान असतो.युग परिवर्तन करण्याचे सामर्थ्य असते, त्या युवा धनाला योग उपासनेशी जोडल्यास एक जबाबदार प्रतिभावान नागरिक बनू शकतो. मी एवढेच म्हणेन योगाचा स्वीकार करा.आणि सर्व समस्या पासून मुक्ती मिळवा. ” करा योग रहा निरोग “

आभार प्रकट करता हुँ मैं
मोदी जी के सरकार का
जिन्होंने बीडा उठा लिया है
सब रोगों के उपचार का…

21 जून को प्रण करले हम
प्राणयाम सभी अपनाएंगे
बाबा रामदेव के आसन से
जनजीवन समृद्ध बनाऐंगे…

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः ! शान्तिः ! शान्तिः॥

सर्वांना नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

नीळकंठ बापुराव मोरे
पतंजली योग समिती तालुका प्रभारी कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *