निरीक्षण शक्ती आणि सकारात्मकता हवी मग आपल्याला सगळच रोमॅन्टिक दिसतं .. सगळच चांगलं दिसतं..
माझा पाऊस मित्र आला आहे त्यामुळे वातावरण प्रफुल्लित झालय आणि त्यात गरमागरम मक्याचं कणीस ,,भजी , गरम चहा कॉफी आणि सोबत मिठीत* ती*..
खरं तर असं प्रत्येकाला वाटतं पण मिळतं किती जणाना ??..
त्यासाठी हवं नशीब भाऊ..
पण काल मी पाहिलेलं अफलातून होतं.. आम्ही तिघं जाऊन खडकवासला डॅमच्या बॅकवॉटरपाशी एका बेंचवर बसलो होतो.. वेळ साधारणपणे ७ ची होती. हलकासा अंधार होता.. आमच्या आसपास अनेक कपल्स बसलेली दिसत होती.. शेजारच्या बेंचवर एक कपल पुसटसं दिसत होतं पण त्यांचा संवाद ऐकु येत होता.. ते दोघे मिळून एक कणीस खात होते..
मधेच एखादा काजवा गवतावर लुकलुकत होता.. आम्ही तिघे त्या पाण्याकडे पहात शांत बसलो होतो.. ना मला कणीस खायचं होतं ना कॉफी प्यायची होती..मधेच हलकीच पावसाची भुरभुर होती जी फक्त मला जाणवत होती.. प्रेमात बुडलेल्या प्रेमी युगुलाला बहुधा त्याचा थांगपत्ताही नसावा.. ते त्यांच्याच विश्वात असताना उजवीकडे बसलेल्या कपलमधे झालेली धुसफूस कानावर पडली.. मनात म्हटलं इथे तरी भांडु नका ना रे .. सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्या की..
मंद वाऱ्याच्या झुळुकीने मन प्रसन्न होत होतं.. माझ्या सोबत असलेल्या मित्राने ,,” मालवुन टाक दिप ” युटुबवर प्ले केलं.. एकदम मंद आम्हाला ऐकु येइल अशा आवाजात आम्ही त्यात रमलो.. त्यानंतर मलमली तारुण्य माझे या गाण्यात मी माझा बेसुरी आवाज मिसळला आणि तिघेही येइल तसं गाऊ लागलो.. अर्धा तास आम्ही गाणी ऐकत होतो.. तोपर्यंत आजूबाजूची कपल्स निघुन गेली होती.. रात्रीचे ८ . ३० वाजले होते.. गर्दी बरीच कमी झाली होती.. मित्राने कॅफीचे दोन कप आणले.. ८ . ३० लाही फार अंधार नव्हता .. मला जरा जास्तच स्पष्ट आणि क्लीअर दिसत होतं.. अशी ही दोन मित्रासोबत केलेली रोमॅन्टिक डेट कायम स्मरणात राहील.. कुठलही शेअरींग नाही ओन्ली केअरींग होतं … कोणीही एकमेकांसोबत बोलत नव्हतो पण तरीही एकमेकांना खुप काही सांगत होतो..
ना एकमेकांना स्पर्श करत होतो पण तरीही मनाला स्पर्शुन जात होतो..
तुम्ही अनुभवलेय का कधी अशी डेट ?? .. नसेल तर जरूर अनुभवा. आणि शेअर सुध्दा करा..
सोनल गोडबोले