पुरूष हृदयचे २६ भाग लिहील्यावर आज स्त्री हृदय लिहायची वेळ आली.. अनेक वाचकानी मला सुचवलं होतं मॅम स्त्री हृदय लिहा ना.. खरं तर काय व्यक्त व्हावं कळत नाही..
आज माझ्या वाचकाने मला काही स्क्रीनशॉट पाठवले .. ते वाचुन आधी मी हसले , मग मला त्या स्त्रीची किव आली.. त्यानंतर मी शांत बसुन त्यावर विचार केला , हरे कृष्णा हरे कृष्णा म्हटलं आणि त्या चॅट चा वेगळ्या ॲंगल ने विचार केला..मी सकारात्मक असल्याने मला त्या चॅट मधे भरपुर चांगल्या गोष्टी दिसल्या ..
ते चॅट असं होतं , सोनल गृपवर चॅट करत नाही ,एवढा गर्व कसला ??.. ती फक्त तिचं लिखाण शेअर करते आणि गृपवरुन निघुन जाते.. आम्ही रीॲक्ट झाल्यावर Thanks म्हणायचे साधे मॅनर्स नाहीत. तिला ॲटीट्यूड आहे..त्यावर एका पुरुष वाचकाने मेसेज केला होता ,,त्या रोज छान लिहीतात , रोज गृप वर शेअर करतात हे पुरेसं नाही का ??त्यांची पुस्तके छान आहेत ,,त्या लैगिकतेवर खुप छान बोलतात आणि मी त्यांना भेटलो आहे..त्या खूपच मोकळ्या आहेत.. त्यावर त्या सखीने लिहीलं होतं , तु स्त्रीयांची बाजु घे. प्रत्येकवेळी स्त्री वेगळी असते…अशा आशयाचे मेसेजेस होते..खरं तर कोणालाही न भेटता आपण त्या व्यक्तीबद्दल आपलं मत बनवु नये..
हे सगळं वाचताना मला वाटलं , ती सखी मेष किवा सिंह राशीची असावी.. सतत संताप , राग ,,चिडचिड त्याचा परिणाम सोनलवर नाही तर तिच्यावर नक्कीच होणार.. कारण अशा स्वभावामुळे शरीरात हार्मोन्स बदल होतात…मेनोपॉजल चेंजेस दिसतात.शरीरात उष्णता वाढतेआणि माणसे दुखावली जातात..अशा स्त्रीला तिच्या घरचे कसे सहन करत असावेत हा प्रश्न मला कायम पडतो.. सतत चिडचिड करुन घरातील वातावरण बिघडतं त्यामुळे overall नकारात्मकता दिसते.. या सखीला मी सांगेन , स्वभावात थोडा बदल करा नाहीतर नुकसान तुमचच आहे.. कदाचित कोणाचा तरी राग कोणावर निघत असेल किवा तिचा स्वभाव तसाच असावा..
आता माझ्याबाबत मी लिहीते.. माझं लिखाण वाचुन वाचकानी रीप्ल्याय नाही दिला तरी चालेल पण त्यातील चांगलं वेचुन पुढे जावं ही अपेक्षा असते.. प्रत्येकाने वाचावं किवा रीप्ल्याय करावा ही पण माझी अपेक्षा नसते.मी माझं काम करते तुम्हीही तेच करावं..सोशल मिडीया गृप आणि त्यांचे ॲडमीन यांचा मी आदर करते..पण १ तास गृप पाहिला नाही तर more than 1000 मेसेजेस असतात.. त्यात gm ,gn , party असे मेसेजेस असतात यात मी डोकं घातलं तर नुकसान माझच आहे..मला माझा वेळ फालतु गप्पा मधे गेलेला अजिबात आवडत नाही.. वैचारीक लेव्हल जिथे असेल तिथे मी रमते याला कोणी ॲटीट्यूड म्हटलं तरीही चालेल..
मला वाटतं दुसऱ्याकडुन अपेक्षा करत बसण्यापेक्षा किवा त्या व्यक्तीवर गॉसीपींगवर वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ वाचन , व्यायाम किवा स्वतःला घडवण्यासाठी करावा.. सोशल मिडीयावर कारण नसताना व्यक्त होवु नका..अध्यात्माने सुध्दा आपल्या विचारात किवा वागण्यात बदल होवु शकतो..त्यामुळे त्या सखीने याचा जरुर विचार करावा..
अशा प्रकारच्या क्रॉस पब्लीसीटीने माझाच फायदा झाला ..त्यामुळे त्या सखीची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते कारण आज तिच्यामुळे स्त्री हृदय लिहायला मिळालं… मी शांतपणे चॅट वाचलं त्यावर एक आर्टीकल लिहुन झालं आणि सखीला काय मिळालं ??जरुर विचार करा…गॉसीपींग कायमच आपल्याला रसातळाला घेउन जातं..
सोच बदलो.. देश बदलेगा..
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री