दररोजच्या सवयी प्रमाणे सकाळी साडेचारला जाग आली. प्रात्यविधी आटपून योगाभ्यास केला. सहा वाजता जे यात्रेकरू बाहेर गावाहून नांदेडला येणार होते ते कुठपर्यंत आले याची चौकशी केली.सकाळी साडे नऊला वडिलांचा आशीर्वाद घेऊन घर सोडले.घराजवळील सोन्या मारोती मंदिर तसेच स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेताना यात्रा सुखरूप पार पडण्यासाठी साकडे घातले. सर्वांना दहा वाजता स्टेशनवर येण्याच्या सूचना दिल्या होत्या मी बरोबर दहाला पोहोचलो.पाहतो तर काय माझ्याआधी जवळजवळ सगळेजण आले होते. यात्रेकरूंचा वक्तशीरपणा पाहून बरे वाटले. आम्हाला निरोप देण्यासाठी आलेल्या अनेकांच्या हातात पुष्पहार, पुष्पगुच्छ होते. अमरनाथ यात्री संघातर्फे लावण्यात आलेले बँड पथक उपस्थित यांचे लक्ष वेधून घेत होते.बम बम भोले… जय मातादी… जो बोले सोनिहाल यासारख्या घोषणांनी वातावरणात उत्साह भरला होता. प्लॅटफॉर्म नंबर एक गर्दीने तुडुंब भरला होता.जाणाऱ्या
यात्रेकरूंनी काळे टी शर्ट व भगवी टोपी घालून परिधान केलेले असल्यामुळे युनिटी दिसत होती.लंगर साहब गुरुद्वारा तर्फे बाबा सुबेकसिंघ यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार केला. यावेळी कामाजी सरोदे, सुरेश शर्मा,शिवा लोट,राजेशसिंह ठाकूर यांनी यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी केली.यात्रे दरम्यान अन्नदान करणारे
सतीश सुगनचंदजी शर्मा,
नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, प्रतिमा राजेंद्र चौधरी,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड,सरदार कुलदीपसिंघ,ओमप्रकाश पाम्पटवार,सरदार जागीरसिंघ,सरदार प्रताप फौजदार,अशोक जायस्वाल ,स्नेहलता जायसवाल ,शेंदूरवाडकर व रावके,प्रदीप शुक्ला, अरुण लाठकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी देण्यात आल्या. सुरेश लोट यांनी आयुर्वेदिक औषधी दिल्या.क्षत्रिय राजपूत महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा ठाकूर यांनी मिनरल वॉटर ची व्यवस्था केली. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी जेष्ठ पत्रकार विश्वनाथ देशमुख यांच्या सह भाजपा,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, लायन्स क्लब, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, शिवा संघटना, शिवसेना, अमरनाथ यात्री संघ, पतंजलीचे सदस्य मोठ्या प्रमाणात आले होते.निरोप देण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.
ट्रेन १ तास उशीरा सुटली. सोडावयास आलेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी प्रसन्न मनाने डोळ्यात आनंदाश्रू आणून निरोप दिला.हमसफर एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर परभणी जिल्हा भाजप उपाध्यक्ष अजय ठाकूर यांनी दिलेल्या उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला.खरे तर डॉ. अजयसिंह यांना मी नाश्ता देण्यास सांगितले होते. पण त्यांनी दुवादशी असल्यामुळे जेवणच दिले.प्रवासादरम्यान यात्रेकरू एकमेकांशी संवाद साधत मार्गक्रमण करत होते .भजन,भक्ती गीत यामुळे वातावरण भक्तीमय झाले . दुपारी ४ च्या सुमारास हमसफर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानकावर आली. आमच्या सोबत यात्रेला येणाऱ्या अमोल गोले ने सर्वासाठी खास घरून चहा कॉफी बनवून आणले होते.मूळचा कोंडलवाडीचा पण सध्या नागपूर येथे स्थायिक झालेला माझा मित्र मनोज शर्मा याने पाठविलेल्या स्वादिष्ट भोजन खाऊन सर्वजण तृप्त झाले. मलकापूर स्टेशन वर संभाजीनगर येथून आलेले राहुल झंवर, संगीता व जयप्रकाश नावंदर हे आमच्यात सामील झाले.त्यानंतर चा प्रवास काहींनी वामकुक्षी घेत तर काहींनी व्हाट्सअप पहात पूर्ण केला.आज जेवण वाटपासाठी सुभाष देवकते,मुकेशसिंह तौर,माधव मस्कले, संजय जाधव, तुकाराम गायकर,संतोष चेनगे, शिवप्रभू कामजवळगे,कालिदास निरणे यांनी परिश्रम घेतले. रात्री साडेदहाच्या सुमारास अमरनाथच्या गुहेतून हा लेख लिहिला.
बर्थ वर पडल्या पडल्या झोप कधी लागली हे समजले देखील नाही.
( क्रमशः)