कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील बुरुड समाजातील सामान्य ठेवरे कुटुंबातील तरुण. त्यांच्या कडे वडिलोपार्जित बांबू बल्ल्यांचा व्यवसाय असल्यामुळे लोकांचें बॅनर लावत लावत पुढे जाऊन त्यांना सामाजिक चळवळीची दिशा मिळाली,
व पुढे जाऊन,गणेश ऊर्फ पिंटूभाऊ शिवाजीराव ठेवरे
ह्यांनी स्वताच अस्तित्व निर्माण करून ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप व केळी व बिस्कीट पुडे वाटपाचा कार्यक्रम. व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप असे विविध कार्यक्रम आयोजित करून ते त्यांच्याच स्वताच्या कर्तुत्वावर प्रसिद्ध झाले. आणि ह्या वर्षी एक मोठा उपक्रम हाती घेऊन त्यांच्या 37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने
सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे व लोहा नगरपरिषदेचे गटनेते पंचशील दादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शुभेच्छा देण्यासाठी प्रा.पुरुषोत्तम धोंडगे, राजहंस शहापूरे , मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार, शेख आशेफ भाई, शेख रब्बानी भाई, अभि भाऊ लिंबोटीकर, नवनाथ शेळके, यांची उपस्थिती होती.
पिंटू ठेवरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीर आयोजन विजू भाऊ कांबळे, शेख सोहेल,अक्रम कुरेशी, वैभव भिसीकर, श्रीनिवास ठेवरे,आदींचा मोठा सहभाग होता.