हीच आमुची प्रार्थना अन
हेच आमुचे मागणे .. माणसाने माणसाशी
माणसासम वागणे..
माझे दोन मित्र मुंबईहुन आले होते.. त्याना तुळशीबाग ,दगडुशेठ , शनिवारवाडा पहायचे होते.. मला म्हणाले , सोनल कार तुझ्या घरापाशी ठेवु आणि बसने जाऊ..
अरे , भारी आयडीया आहे.. चालेल असं म्हणत त्यांना वारजे ते मंडइ असा पीएमटी प्रवास घडवायचा ठरवलं.. बस माळवाडीतुन आली होती त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. कंडक्टर पुढे व्हा असं ओरडत होता. मी आणि मित्र पटकन पुढे गेलो तर एक स्त्री बसली होती आणि तिच्या शेजारची सीट रिकामी होती. मला अरुण म्हणाला , सोनल तु बस.. आम्ही उभं राहुन पुणं अनुभवतो. मी मनातच म्हटलं , लोक उभे आहेत .. इथे जागा असुन बसले का नाहीत ??.. तितक्यात त्या महिलेने रस्त्यावर चाललेले तृतीयपंथी पाहुन टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती तृतीयपंथी होती म्हणुन लोक तिच्या शेजारी बसले नाहीत..
मला लोकांच्या विचारसरणीचं खूप वाईट वाटलं. .. पुढच्या बसस्टॉपवर ती महिला उतरुन गेली आणि माझा मित्र माझ्या शेजारी बसला… तो म्हणाला , काय गं . काय झालं ??.. चेहरा का उतरला ?? .. मी म्हटलं, बोलु नंतर.. आपण पुणं फिरु आणि मग बोलु.. मी मनात विचार करु लागले , माझ्या पुण्याबद्द्ल मी यांना काय सांगु ?? कारण पहिलाच अनुभव त्यांचा हा असा होता.. शिरीषच्या लक्षात आलं , तो म्हणाला , सोनल मुंबईत असले प्रकार घडत नाहीत.. तिथे लोकल मधे किवा बसमधे आम्ही सगळे एकच असतो. मुंबई कधीच कोणाचा दुजाभाव करत नाही. .. तु वाईट वाटुन घेउ नकोस..
मनात विचार आला , हीच मंडळी यांच्याकडे सेक्स साठी जातात.. हीच मंडळी यांच्याकडे आशीर्वाद मागतात.. आणि हीच मंडळी हिजडा ,छक्का म्हणुन यांना हिणवतात.. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात हेच खरं.. तृतीयपंथी ही सुध्दा बऱ्याचदा व्हायब्रंट असतात किवा व्यसनी असतात.. मारामारी करतात किवा वाईट बोलतात पण असे लोक तर आपल्यात पण आहेतच की.. मग यांना वाळीत टाकण्याची गरज काय ??. माझ्या मित्रांच्या मनात पुण्याबद्द्ल काय आलं असेल माहीत नाही पण मी मात्र निराश झाले.. मी समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करते .. आता येणारं माझं आठवं पुस्तक हे एका ट्रांसवुमन चा जीवनप्रवास आहे.. आणि माझी तिच्याशी चांगली मैत्री आहे.. अजुन काही तृतीयपंथी महिला माझ्या फ्रेंड्स आहेत.. त्याने कुठेही माझं स्टेट्स कमी झालं नाही आणि होणारही नाही.. आपलं स्टेट्स आपल्या आचारविचारात हवं.. कारने गेलो असतो तर ही मानसिकता कळली नसती पण बसमुळे लोकांची अजुन एक वेगळी बाजु जाणुन घेता आली.. मुंबईच्या मित्रांना पुणं दाखवलं पण पुणेकरांनी मुंबईकराना काय दाखवलं ?
सोच बदलो.. देश बदलेगा..
सोनल गोडबोले.. लेखिका