पदमा , पेशाने डॉक्टर .
दिसायला सुंदर , हुशार, सर्वसामान्य मुलींची जी स्वप्न असतात तीच तिची होती…लग्न , घर ,संसार पण याहीपेक्षा एक वेगळं असं तिचं स्वप्न होतं ते म्हणजे तिला चार बाळं ( मुली ) हव्या होत्या.. मुलगी होणं किवा मुलगा होणं हे तिच्या हातात नक्कीच नव्हतं … तिचा नवरा बिझनेसमन.त्याला एकच मुल हवं होतं.. मग तो मुलगा असो कि मुलगी..
पण स्त्री हट्टापुढे कोणाचं काहीही चालत नाही.. त्यांना पहिली मुलगी झाली.. ती जेमतेम एक वर्षाची होतेय तोपर्यंत तिला पुन्हा दिवस गेले.. ती दिवसभर क्लीनीकला असायची.. मुलीला सांभाळायला तिने एक मुलगी ठेवली होती पण तरीही लहान बाळ रात्री रडलं की त्याची झोपमोड व्हायची , बऱ्याचदा चिडचिड व्हायची… ती डॉक्टर असल्याने तिच्या लक्षात आलं याची चिडचिड फक्त झोपमोड होते म्हणुन होत नाही तर याला शारीरिक संबंधाची पण गरज आहे आणि जी मी आता पुरी करु शकत नाही.. तिचं तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम असतं आणि तितकाच विश्वासही असतो..
एक दिवस ती त्याच्या जवळच्या मित्राला फोन करते , त्याच्याकडे २०००० रुपये देते आणि म्हणते , याला घेउन २ दिवस बाहेर जा आणि मज्जा करुन या.. पण जे काही असेल ते फक्त तिथेच सोडा आणि वेळेवर घरी या.. मित्र त्याला घेउन बाहेर जातो .. पहिल्या दिवशी ड्रींक , सेक्स मज्जा करतात पण त्याला त्याच्या बायकोची आणि मुलीची प्रचंड आठवण येते आणि स्वतःला तो भाग्यवानही समजतो.. अशी बायको असेल का कोणाची ??.. मनोमन तिची कृतज्ञता व्यक्त करतो..तिला फोन करतो .. फोन उचलल्या उचलल्या पद्मा त्याला म्हणते , मला माहीत आहे तुला माझी आठवण आलेय पण आता तुला शारीरिक सुखाची गरज आहे त्यामुळे तुझी चिडचिड होतेय.. लवकर परत ये.. मी वाट पहातेय.. love yu.. असं म्हणत फोन ठेवुन ती तिच्या कामाला लागते.. त्याला काय बोलावं कळत नाही.. तो त्या मुलीला पैसे देतो , तिने दिलेल्या सुखाबद्दल आभार मानतो आणि घरी जातो.. घरी सगळं नॉर्मल असतं..त्याचा मित्र पद्माला म्हणतो , एकही मीनीट असं गेलं नाही त्याने तुझी आठवण काढली नाही.. या त्याच्या वाक्यावर आणि नवऱ्यावर असलेल्या प्रेमामुळे ती धायमोकलुन रडते… त्याची थोडी चिडचिड कमी झालेली असते..
दुसऱ्या दिवशी तोही त्याच्या कामात व्यस्त होतो.. तिचं पोटातलं बाळ वाढत असतं आणि मोठी मुलगी तीही छान मोठी होत असते.. काही महिन्यात दुसरीही तिला मुलगी होते.. पण तिसऱ्यादा जेव्हा ती पुन्हा बाळासाठी डिमांड करते तेव्हा तो म्हणतो , एका अटीवर मी तुला हे सुख देइन ते म्हणजे मी चिडचिड केली तरीही तु मला बाहेर जा म्हणणार नाहीस कारण ज्याची मला सवय लागेल.. माझ्या आयुष्यात एकदा हा अनुभव मी घेतला .. आता पुन्हा नको… ते ऐकुन तिलाही रडु येतं पण चार मुली हव्या या विचारांवर ती ठाम असते ..तिला खरच चार मुली होतात.. गेली १४ वर्षे चार मुलींसह त्या दोघांचा उत्तम संसार सुरु आहे…
नवरा बायको जर एकमेकांच्या गरजा ओळखुन वागले तर संसार कसे फुलु शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे.. कोणीही याला कुठलीही लेबल्स लावु नयेत कारण माझ्या ओळखीत घडलेली ही सत्य घटना आहे.. प्रत्येक गोष्टीचा माझ्या वाचकानी चारही बाजूने विचार करावा…माझी रोजची आर्टीकल्स वाचुन माझा प्रत्येक वाचक हा चौकस बनावा हीच इच्छा..
सोनल गोडबोले.. लेखिका
.