प्रतिभा कोकरे
सध्या महिला सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर आहेत.असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला आपला ठसा उमटवला नाही.महिला म्हटले की, त्या नाजूक,कोमल आणि लाज-या,बुजणा-या असतात असा गोड गैरसमज असला तरी याच समाजात राहून महिलांनी त्यांची एक ओळख निर्माण केली आहे.असच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व प्रतिभा कोकरे,ज्यांनी सिध्दकेलय की महिलांनी मनात आणल तर त्या काहीपण करु शकतात.त्यांच्याशी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात-
१) तुमचा थोडक्यात परिचय,कौटुंबीक माहिती.
-माझे नाव प्रतिभा परशुराम कोकरे.मी पालीनगरला राहाते.माझी आई शेती करते आणि मला वडिल नाहीत,त्यामुळे माझ्यासाठी माझे सर्वस्व आईच आहे.घरी दोन भाऊ,भावजयी आणि माझे भाचे आहेत.माझे सारे विश्वत्यांच्यात सामावलेले आहे.
२) नर्सिंगच शिक्षण झालं असतांना उदरनिर्वाहासाठी अॅटो चालविण्याचा निर्णय का घेतला?
-तस पाहील तर नौकरी मध्ये अडकून राहाणे हे मला कधीच मान्य नव्हतं.काहीतरी वेगळ कराव अस नेहमी वाटायच.त्यातुन स्वता:चा अॅटो विकत घेण्याची इच्छा ब-याच दिवसापासुन होती.ती आता सत्यात उतरली.
३)अॅटो चालवितांना पुरुषांचा तुमच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोण कसा आहे?
-समाजामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत.काहीजणांचा पाहाण्याचा दृष्टीकोण खुप घाणेरडा असतो पण,काही पुरुष खरच खुप चांगले आहेत.जे स्वता:हून मला बहिण म्हणून सहकार्य करतात.तर काही जण महिला आहे म्हणून कमी लेखतात.मी मात्र त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करते.शक्यतो ग्राहक म्हणून वृध्दमंडळी आणि शालेय विद्यार्थी यांनाच प्राधान्य देते.
अपने हौसले से
तकदीर को बदल दूँ,
सुन ले दुनिया,
हाँ मैं औरत हूँ…
४)आॅटो खरेदी करण्या विषयी घरातील सदस्याची काय प्रतिक्रीया होती?
-माझ्या आईकडे मी थोडी घाबरतच अॅटो खरेदी करुन देण्याची मागणी केली होती,त्यावेळी आईने कोणतेही प्रश्न न विचारता माझी मागणी पुर्ण केली.हा क्षण माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.शेवटी आई ही आईच असते,याची प्रचिती मला आली तसेच भाऊ,भावजयी यांनी देखिल माझ्या या निर्णयाचे स्वागत करुन मला प्रोत्साहान दिले.मला समजून घेणारी माणसं माझ्याजवळ आहेत याच खुप समाधान वाटत.उज्जवल एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी अॅटो खरेदी केला.मॅनेंजरनी एक महिला म्हणुन अॅटोची रक्कम कमी केली.आणि त्यांनी ओपनिंग धुमधडाक्यात केले.या वेळी सर्व महिला स्टाॅफ हजर होता.
५)साहाजिकच तुमची ओळख आता समाजामध्ये “एक महिला आॅटोरीक्षा चालक” म्हणून झाली आहे…कसं वाटत?
-माझ्यासाठी हा एक प्रकारचा “सन्मानच आहे”कारण,दोनवेळचे पोट भरण्यासाठी कामाची कसली आली लाज?हा अॅटो माझ्यासाठी”लक्ष्मी” आहे.स्वता:च्या पायावर ऊभी आहे हेच माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.
६)बेरोजगार महिलांसाठी तुम्ही एक आदर्श आहात,प्रेरणा आहात याचे श्रेय कुणाला द्याल?
-याचे सारे श्रेय माझ्या आईला जाते.आयुष्यात अनेक चढउतार पाहिले.दु;ख,वेदना काय असते ते जवळुन अनुभवलं,त्याच भांडवल न करता मी त्यावर मार्ग काढला. आईने भक्कम आधार दिला.रडत न बसता लढायला शिकवले.ईच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच.त्यामुळे प्रयत्न करत राहा फळ नक्कीच मिळेल असे मला वाटते.नौकरीच्या माघे न लागता महिलांनी आपल्यातील कलागुणांना ओळखुन व्यसाय करावा,त्यामुळे कुणाच्या हातापाया कडे पाहाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
७)अॅटो चालवतांना येणा-या असंख्य अडचणीवर कशी मात करता?एखादा अविस्मरणीय असा क्षण कोणता?
-खरे तर आॅटोरिक्षा चालवणे हा काही तोंडचा खेळ नाही,पण,नांदेड मधील लोक खुप प्रेमळ आहेत.अडचणीच्या वेळी मदतीला तत्पर धावून येतात.हे विशेष.तसेच नांदेड पोलिस,ट्रॅफीक पोलिस यांच देखिल खुप प्रोत्साहान मिळतं,त्यामुळे आपण काहीतरी वेगळ करतोय याचा अभिमान वाटतो.एकदा रस्त्याने चालणा-या एका वृध्दस्त्रीला मी पैसे न घेता अॅटो मध्ये बसवुन त्यांच्या तरोडा भागातील घरी नेऊन सोडले,त्यावेळी त्या आज्जीने माझ्या डोक्यावर हात फिरवत मला आशिर्वाद देत खुप लाड केला.त्यावेळी खुप गहिवरुन आल होत तो क्षण माझ्या कायम स्मरणात राहिल.ङू
८) वाचकांना काय संदेश द्याल?
-बाईपण निसर्गान दिलेली एक अमुल्य अशी देणगी आहे,आपल्यातील आदृश्य शक्ती ओळखा.कुणीतरी आपल्या मदतीला धावून येईल ही भावना मनातुन काढून टाका आणि”आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार” आहोत हे ध्यानात ठेवून कष्टाची तयारी ठेवा.कारण,
हिम्मत को साथी चुन कर
हर मंजिल को तुम फ़तह करो।
अबला नहीं हो तुम नारी
इस बात का अभिमान करो।
खरचं…एक महिला आॅटोरिक्षा चालक म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो,प्रतिभा ताई तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि खरचं तुमचे मनापासुन अभिनंदन…!!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१