सुपरस्टार- राजेश खन्ना
माझ्या आई-वडिलांच या सिनेअभिनेत्यानी अख्ख आयुष्य व्यापून टाकलेलं होतं. तो काळ म्हणजे अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या चित्रपटाचा काळ…या दोन्ही पैकी कोणता
सिनेस्टार जास्त आवडतो असं विचारल्यास वादावादीलाच सुरुवात! मग नंतर राजेश खन्ना यांनाच जास्त पसंती दिली जात होती.
राजेश खन्ना हे केवळ पहिले सुपरस्टार नव्हते तर भारतीय सेल्युलॉइडवर कृपा करणारे एकमेव होते. त्याकाळी सलग 15 सुपरहिट चित्रपटातुन त्यांनी वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले होते.
त्यांच्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करणारी गोष्ट म्हणजे आपण ज्यांचा विचारही करू शकत नाहीत अशा भूमिका करण्याची क्षमता.. कल्पना करा की एखाद्या लोकप्रिय स्टारने बावर्ची किंवा अवतार किंवा रेड रोझमध्ये आपली भूमिका साकारली आहे आणि त्यांना त्या पद्धतीने काम करायला लावले आहे!!! अमर प्रेम मधील अतिरिक्त प्लॅटोनिक प्रेम असो किंवा आराधना मधील इतिहासातील सर्वात हुशार पायलट म्हणून त्याची कामगिरी त्याला पाहण्यासाठी खास बनवते. सामान्य भूमिकांना असामान्य व्यक्तिरेखा बनवण्याची त्याची विलक्षण क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते!!
शम्मी कपूर अभिनेताचा अस्त होताना देवानंद, दिलीप कुमार आणि राज कपूर हे त्रिकूटनिबर वाटू लागलेले. पण राजेश खन्ना यांनी त्याकाळच्या भारतीयांसाठी असलेल्या एकमेव मनोरंजनाच्या साधनाला संजीवनी देऊन क्रांती घडवली.
त्यांचें स्मितहास्य, मान हालवणे, इनोसन्ट चेहरा, बोलके डोळे, अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व वाटू लागले.
त्यातच किशोर दा, आर.डी. बर्मनची साथ आणि फ्रेश हिरॉईन्स आणि सुंदर लोकेशन्स! त्यांच्या जोडीला असायचे. मला वाटते
त्याने अनुभवलेले रसिकांचे प्रेम त्या आधी आणि नंतर आजवर कोणाच्याही वाट्याला आलेले नाही. त्यांच्या वर चित्रीत झालेल्या गाण्याबद्दल ही काय काय लिहावे कळतच नाही असे एकापेक्षा एक सरस एकदम सुमधुर अशी गाणी होती.आज ही ते प्रत्येकाच्या ओठांवर येताना दिसुन येतात.
जायेंगे पर किधर
है किसे ये खबर
कोई समझा नही
कोई जाना नही
जिंदगी का सफर……
राजेश खन्ना आणि मुमताज यांची पर्फेक्ट जोडी… चित्रपटात दिसायची.
असे कधी होत नाही की कोणी महान व्यक्ती निधन पावल्यावर व्यक्तीगत पातळीवर दु:ख व्हावे. पण यांच्या जाण्याने सारा आसमंत गहिवरला होता. तो दिवस म्हणजे 18 जुलै 2012 रोजी सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जगातून अखेरचा निरोप घेतला.
त्यांच्या स्मरणार्थ हा लेख आपल्या स्वाधिन…
काकास भावपूर्ण आदरांजली!
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211