मेनोपॉज आला..
जगायचच राहिलं..
सखीनो, भरभरुन जगा..
जगणही आपल्याच हातात आहे आणि रोज कुढत मरणही आपल्याच हातात आहे..
सोनल ने कसे ड्रेस घातले किवा ती लैगिकतेवर लिहीते यावर गॉसीपींग करण्यापेक्षा तो मौल्यवान वेळ स्वतः जगण्यासाठी घालवा.. बालपण अभ्यासात गेलं नंतर संसार आणि आता मुलं मोठी झाल्यावर आपला वेळ आपण गॉसीपींगवर घालवला आणि पन्नाशीच्या उंबरठ्यावर मेनोपॉज आल्यावर जगायचच राहिलं ही भावना मनात यायला नको..
मेनोपॉज आणि जगण्याचा काहीही संबंध नाही..
मेनोपॉज आणि सेक्सचा काहीही सबंध नाही
मेनोपॉज चा आनंद देण्याघेण्याशीही काहीही संबंध नाही..
भरभरून जगताना आपली सखी कधीही आडवी येत नाही अर्थात तुम्ही तिच्यावर प्रेम करत असाल तर..
ती महिन्याला आपल्याला भेटायला येते आणि निघुन जाते.
तिचा आदर करा.. तिच्यामुळे आपण आई झालो ही कृतज्ञतेची भावना हवीच..
तिच्यामुळे आपले सौंदर्य नष्ट होत नाही तर मानसिक ताणामुळे सौंदर्य नष्ट होते.. तिच्यामुळे वाईट काहीही होत नाही , तर आपल्या कर्मामुळे होते मग तिला आपण व्हीलन का करतो ??
कामात व्यस्त रहा.. क्रीएटिव्ह कामे करा.. व्यायाम करा.. निसर्गात जाऊन आनंद घ्या आणि द्या.. चांगला संघ पाहुन त्यात रमा आणि हो या सगळ्यात भगवंताला विसरु नका..
जसं आपण एक दिवस हे जग सोडुन जाणार तसेच सखीही एक दिवस आपल्यापासुन दुर जाणार हा निसर्गाचा नियम आहे..
अजूनही वेळ गेली नाही.. गॉसीपींग करुन पाप वाढवण्यापेक्षा सगळ्याना आपल्यात सामावुन घेउयात..
सोनल गोडबोले.. लेखिका