२२ व्या अमरनाथ यात्रेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या ७५ यात्रेकरूंचे अमरनाथचे व्यवस्थित दर्शन झाले असून खडतर असलेल्या अमरनाथचे पंधरा दिवसात दोनदा दर्शन घेणारे दिलीप ठाकूर हे पहिलेच यात्रेकरू असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या जथ्यांचे दर्शन झाल्यानंतर वातावरण खराब होऊन दर्शन बंद होण्याचा प्रकार अनेक वेळा झाला. त्याची पुनरावृत्ती या वर्षी देखील झाली.
मंगळवारी सकाळी ३ वाजता बालटाल बेस कॅम्प वरून नांदेडची तुकडी दर्शनासाठी निघाली.जयश्री व विनायक जाधव,मंजुषा व अशोक दारनुले,शर्मिला व
प्रीतमचंद चौधरी,प्रल्हाद कर्णेवार,विना शेवलीकर,रेवती पिंपळगावकर,संजय चामनीकर,धनंजय डोईफोडे,संजय डोईफोडे,मधुसूदन श्रीरामवार,जग्गनाथ कोंडावार,अशोकराव साखरे,पुरभाजी कदम,गोविंदराव कदम,पंढरीनाथ भदाणे
शरदचंद्र बोरसे,दत्तात्रय तिम्मापुरे,दिलीप ठाकूर,लक्ष्मीकांत जोगदंडे,विशाल मुळे, यांनी येण्याजाण्यासाठी २२ किमी अंतर घोड्यावर तर ६ किमी अंतर पायी पूर्ण केले.२८ अंतर डोलीतून पूर्ण करणाऱ्या मध्ये शिक्षणाधिकारी सविता बिरगे,उप शिक्षणाधिकारी संतोष शेटकर,सिद्धगौडा बिरगे, सपना शेटकर,संगीता व लक्ष्मीकांत पाठक, सुप्रिया व सुहास क्षीरसागर, मंगला व देविदास फुलारी,गंगामणी व नरसिंमलू पापीनवार,विजया व नितीन देशपांडे,संजीवनी व बळवंत जोशी,आनंदी व दिलीप चाटूफळे, स्मिता व सुनंदा जाधव,स्वाती व विनायक कुलकर्णी, मिनाक्षी ब्रह्मे,सुनंदा देशपांडे,सुनिता कर्णेवार, शेषनारायण मुत्तेपवार,ललिता व उद्धवराव जाधव,सीमा मद्रेवार,शंकर यशवंतकर, विमल व बालाजी यमलवाड, पुष्पा जाधव,संजीवनी व गजानन चिद्रावार, वेदांग पोलावार,शिवानी चिद्रावार, अर्चना व लक्ष्मीकांत चिकटवार,
प्रणिता व विठ्ठल पोलावार,गोदावरी महाजन यांचा समावेश आहे.शंकर जाधव आणि प्रल्हाद जोगदंड यांनी पूर्ण प्रवास पायी करून सर्वांना चकित केले.हेलिकॉप्टरद्वारे दर्शनासाठी गेलेले वैजयंता व विठ्ठल कवटीकवार,मंगला बच्चेवार यांचे दर्शन झाल्यानंतर वातावरण खराब झाल्यामुळे पंचतरणी येथे अडकले होते. गुरुवारी सकाळी वातावरण पूर्ववत झाल्यामुळे ते देखील श्रीनगर येथे सुखरूप पोहोचले आहेत. श्रीनगर येथील शालिमार व निशाद या मुगल गार्डनला सर्वांनी भेटी दिल्या. जगप्रसिद्ध डललेक मध्ये शिकारा राईडचा आनंद लुटला. यात्रेदरम्यान प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी व विशाल मुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.गुरुवारी गुलमर्ग या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊन शुक्रवारी सकाळी वैष्णोदेवी देवीच्या दर्शनासाठी श्रीनगर येथून कटऱ्याकडे रवाना होणार आहेत.संदीप मैंद, मिलिंद जलतारे, विशाल मुळे, लक्ष्मीकांत जोगदंड यांच्यासह ठाणे येथील उदय वेखंडे यांच्या कॅटरिंग टीम मधील ७ सदस्य चोख व्यवस्था करत आहेत.आयुष्यातून एकदा तरी अमरनाथ यात्रा करावी अशी सर्व हिंदूधर्मियांची मनोकामना असते. अनेक टूर ऑपरेटर अमरनाथला दरवर्षी ग्रुप घेऊन जातात.पण अमरनाथच्या गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता अतिशय कठीण असल्यामुळे दर्शनाला जात नाहीत.त्यामुळे दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत २२ वेळा अमरनाथचे दर्शन घेतले हा एक विक्रम आहे.सर्व यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी श्रीनगर येथून कळविली आहे