माझ्या मित्रासोबत लंच ला गेले होते.. पण तिथे गेल्यावर मसाला डोसा खायची इच्छा झाली… त्याने त्याच्यासाठी कुरकुरीत डोसा ऑर्डर केला.. खरं तर मला कुरकुरीत डोसा आवडत नाही कारण खाताना त्याचे तुकडे होतात .. मग सांबार मधे नीट बुडवला जात नाही.. किवा भाजीसोबत खाता ना तो तुटतो..
त्यावेळी जाणवलं या डोश्या सारखच आपलं आयुष्य आहे ना.. सोशल मीडीयावर अनेक गृप्सच्या माध्यमातून अनेक मंडळी संपर्कात आली .. त्यांना मित्र म्हणावे का हा प्रश्न काल उभा राहिला.. कारण त्याच लोकांनी एकाच्या वॉलवर केलेलं ट्रोलींग आणि त्यात पुरूष आणि स्त्री दोन्ही हृदयं एकत्र होती.. वाचुन त्यांची किव आली.. त्यांच्या विचारसरणीचे त्या कुरकुरीत डोस्यासारखे तुकडे झालेले पाहिले त्यांनी माझ्यावर त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवलेला पाहिला आणि एका संतांची आठवण आली.. त्यांच्या अंगावर सतत थुंकणाऱ्या माणसाला ते उलटुन न बोलता आंघोळ करत राहिले आणि स्वतः स्वच्छ राहिले अगदी तनाने आणि मनानेही..
कोणीही मोठा होताना बऱ्याच जणाना पहावत नाही आणि मग असले प्रकार सुरु होतात आणि जेव्हा त्यात सो कॉल्ड मित्र असतात तेव्हा तर मैत्रीवरचा विश्वास उडतोम्हणुन सखा असावा तर कृष्णासारखा ज्याने अर्जुनाला युध्द कर सांगितले नाही तर त्याला मार्गदर्शन करुन त्याच्या सोबत राहुन पाप काय , पुण्य काय याबद्दल माहीती देत त्याचा रथही हाकला..
सोशल मिडीया वाईट नाही ना तिथली मंडळी वाईट.. या जगात वाईट काहीच नाही पण एक मिठाचा खडा सगळं दुध नासवतो.. मीठ कुठलं आणि साखर कुठली हे आपल्याला ओळखता यायलाच हवं ना.. किती जवळ जायचं आणि किती गोष्टी कोणाशी शेअर करायच्या हे माहीत असायलाच हवं नाहीतर कुरकुरीत डोश्यासारखं व्हायचं…फक्त ताटात तुकडे ..
चांगला गृप आणि चांगले लोक याचीच निवड कराआणि हो भगवंताचे नाव घ्यायला विसरु नका..
सोनल गोडबोले.. लेखिका