नांदेड : भारताचे माजी गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चुरशीच्या लढती होत आहेत. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून तब्बल 444 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता . काल या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पर्धकांनी जिद्दीने खेळ केला या सामन्याचा अंतिम सामना आज दिनांक २५ रोजी सकाळी यशवंत महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टावर होणार आहे अशी माहिती स्पर्धेचे संयोजक तथा जिल्हा सचिव डॉ. महेश वाकरडकर यांनी दिली . अंतिम सामना संपल्यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरणही उद्याच दुपारी तीन वाजता माजी पालकमंत्री डी.पी सावंत, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले , जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री कै. डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे . या स्पर्धेत महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून 400 हून अधिक दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना काल दिनांक 24 जुलै रोजी सायंकाळी यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात पार पडला तर तत्पूर्वी झालेल्या सेमी क्वार्टर फायनल मध्ये दुहेरी स्पर्धेत नागपूर आणि पुण्याच्या अजिंक्य पाथर्डीकर आणि सानिया तापीकर यांनी ठाण्याच्या अभुदय चौधरी आणि अनघा करंदीकर यांचा 21 – 7, 22 -20 अशा चुरशीच्या सामन्यात पराभव केला .पुण्याच्या दीप रंभिया आणि अक्षया वारंग यांनी पुण्याच्या यश शहा आणि आरती चौगुले यांचा 21 -15 ,21 -11 असा सरळ पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले होते. नागपूरचा संकल्प गुरला यांनी पुण्याच्या अभिषेक कुलकर्णीवर 21-19, 21- 8 असा सेटमध्ये पराभव केला. पुण्याच्या आर्या यांनी पुण्याच्याच दर्शन पुजारीवर 15 -21 , 21-6 आणि 21 -19 अशा फरकाने विजय मिळवला या स्पर्धेत पुण्याच्या श्रुती मुंदडा हिने ठाण्याच्या मृण्मयी देशपांडे हिचा 21 -19 ,21 -14 अशा फरकाने पराभव केला तर तर दुहेरी सामन्यात अक्षय शेट्टी आणि दीप रमभिया यांनी ठाण्याच्या अक्षय राऊत आणि कबीर कंजरकर यांचा 21 -18 ,21 -14 अशा सेटमध्ये पराभव केला. ठाण्याच्या अक्षया वरंग आणि हरिषा दुबे यांनी पुण्याच्या आरती चौगुले आणि सानिया तापकर यांचा 15- 21 , 21 -17 आणि 22 -20 अशा चुरशीच्या लढत पराभव केला. अमन संजय आणि प्रतीक रानडे या जोडीने अर्जुन सुरेश आणि सुदेश राऊत यांचा 21 -16 ,17 -21 आणि 21- 14 असा पराभव करत या लढतीत चुरस निर्माण केली होती तर मुलींच्या दुहेरी लढतीमध्ये रीतीका ठाकूर आणि सिमरन सिंग या नागपूरच्या जोडीने पुण्याच्या साद धर्माधिकारी आणि योगिता साळवे यांचा 21- 8, 21 – 11 असा सहज पराभव केला. आज झालेल्या सामन्यांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती .
उद्या दिनांक 25 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून अंतिम सामन्यानंतर लगेच स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मंत्री डी.पी. सावंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे नांदेड जिल्हा सेक्रेटरी तथा संयोजक डॉक्टर महेश वाकरडकर , मुख्य कोच विश्वास देसवंडीकर आदींची उपस्थिती राहणार आहे.