नांदेड: शहरातील शारदा नगर भागात सुप्रिया नाईक प्रस्तुत दांडिया क्लासेसचा शुक्रवार दि. ११ रोजी शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. निकिता बी. डी. चव्हाण आणि त्यांची टीम, सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत गुंजनताई गिरी, श्री. गजानन गिरी, सौ. ज्योती माने, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड, लिटल स्टार पब्लिक स्कूलच्या संचालिका सुनंदा एडके, साहित्यिक सौ.कलावती घोडके, सौ. छबुबाई करवंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरांमध्ये आता दांडिया प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. पत्ता : घर नं. १/०९/२०३, आनंद नगर / जिजाऊनगरच्या पाटीच्या उजव्या बाजुस, पहिला वळण, शारदा नगर, नांदेड भागात नुकताच शुक्रवारी दांडिया क्लासेसच्या भव्य शुभारंभ पार पडला. या ठिकाणी आता गुजराती दांडिया ढाकला, रास आणि ट्रॅडिशनल गरबा आदींचे क्लासेस घेणार आहेत. शहरातील दांडिया प्रेमी तरुण- तरुणींनी जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन दांडिया क्लासेसच्या संचालिका सुप्रिया नाईक आणि सोनू दरेगावकर यांनी केले आहे. तसेच अगदी सवलतीच्या दरात या क्लासेसला प्रवेश घेता येणार असल्याने दांडिया प्रेमींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सौ.लता शिव नाईक, श्री. शिव रामा नाईक, सौ. अचाल विशाल नाईक, श्री. निखिल शिव नाईक परिवारानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू दरेगावकर यांनी केले तर आभार सुप्रिया नाईक यांनी मांडले.