मुंबई, (प्रतिनिधी) अंधेरी पूर्व एमआयडीसी तील शेकडो ताबाधारकांना घुसखोर ठरविल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. तसेच चारशेच्यावर सदनिकाधारक अद्यापही घरांपासून वंचित आहेत, त्यांना सदनिकांचा ताबा मिळाला नाही तर येत्या काही दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे अध्यक्ष संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डाॅ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदना द्वारे दिला .
अंधेरी पूर्व एमआयडीसीतील ताबाधारकांना विकासकानेच ताबा पत्र दिलेली आहेत. चावी सह करारनामाही देण्यात आले शिवाय इमारतीच्या बाहेर बाउंसर बसवले असतांना, त्यांना घुसखोर कसे काय म्हणता येईल? असा सवाल पॅन्थर डाॅ. राजन माकणीकर यांनी उपस्थित केला आहे.
२३९ ताबाधारक आहेत. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतरच त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला असताना एमआयडीसी कार्यालयातून त्यांनाच घुसखोर ठरविण्यामागे काय हेतू असावा ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एसआरए योजनेतील अद्यापही चारशे सदनिकाधारक हे मालकी घरापासून वंचित आहेत.
याच एसआरए परिसरात वेल्फेअर सेंटर, बागबगीचा, बालवाड्या आदी 10 हजार कोटी रुपयांचा प्रचंड घोटाळा तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आला आहे. त्या-त्या अधिकाऱ्यांच्या वंशावळी संपत्तीची चौकशी करून त्यांना आधी गजाआड करण्यात यावे. अस ही डाॅ. राजन माकणीकर यांनी म्हटले आहे.
ज्या जागा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी राखीव आहेत. त्या जागी भलतंच काही उभारण्यात आल आहे, आधी त्या जागा रिकाम्या कराव्यात अशी मागणीही करण्यात आलेली आहे. या प्रकरणी विकासकाचा एफएस कमी करून ताबाधारकांना कायम करावे व वंचित झोपडीवाशियांना अन्य इमारती बांधून त्यांचे पुनर्वसन करावे, अन्यथा २३९ ताबाधारक आणि ४०० झोपडीधारक यांचा अंधेरीतील एमएमडीसी कार्यालयावर कुंटूंबासह उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही डॉ. राजन माकणीकर यांच्या तर्फे देण्यात आला आहे.