कंधार : ( प्रतिनिधी )
कंधार शहराच्या सर्व बाजुंनी राष्ट्रीय महामार्गाने जोडुन जिल्हा मार्ग राज्यमार्ग एकमेकाला जोडून येथील पर्यटनाला वृध्दी मिळावी आणि रस्त्यातील वाडी तांडे यांचा विकास व्हावा यासाठी या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाची दर्जोन्नती करून सुधारणा करण्याची मागणी कंधार तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, ग्रामीण विकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले असून काम अंतिम टप्यात आहे, इतर जिल्हा मार्ग 109 महादेव पाटी फुलवळ ते पानशेवडी कुरुळा रस्ता,पुढे उदातांडा घना तांडा पाताळगंगा व शेकापूर पानशेवडी उमरगा प्रमुख जिल्हा मार्ग 68 या रस्त्याची दर्जोन्नती करून सुधारणा करण्याची मागणी केली आहे
तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग १०९, राष्ट्रीय महामार्ग ५० महादेव पार्टी फुलवळ ते कंधारेवाडी – पानशेवडी राज्य श महामार्ग ५६ कुरूळा रोडला जोडला जात असून सदरील रस्ता पुढे उदातांडा – घना तांडा – पाताळगंगा पर्यंत वाढविण्यात यावी व प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देवून दर्जोन्नती सह रस्त्याची सुधारणा झाल्यास परिसरातील जनतेला याचा फायदा होणार आहे व पानशेवडी परिसरातील भाविकांना संत नामदेव महाराज संस्थान उमरज चे दर्शन घेण्यासाठी जवळचा रस्ता होणार आहे. अनेक वर्षापासून परिसरातील जनतेची ही मागणी असून सदरील रस्त्यास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देवून दर्जोन्नती करण्यात यावी .
तसेच तालुक्यातील प्रजीमा 68 शेकापूर – पानशेवडी- उमरगा – हाडोळी (ज) हा रस्ता लातूर जिल्ह्याला जोडलेला असून सदर रस्त्यावर मोठ्याप्रमाणत वाहतुकीची गर्दी असल्याने उपरोक्त नमूद रस्त्याची दर्जोन्नती करून रस्त्यास राज्य महामार्गाचा दर्जा देण्याबाबत कंधार तालुक्यातील नागरिकांची सातत्याने मागणी होत आहे. तरी उपरोक्त नमूद प्रजीमा 68 शेकापूर पानशेवडी- उमरगा – हाडोळी (ज) हा रस्ता शेकापूर पासून शिवेवरील गणपती मंदिरा जवळ राज्य मार्ग 56 ला जोडावे व या रस्त्याची राज्य महामार्ग अशी दर्जोन्नती करून रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे .