भानावर या..पूण्याचे पांडूरंग रायकर आणि पत्रकार

पूण्याचे पांडूरंग रायकर आणि अन्य माझ्या माहितीतले किमान सहा पत्रकार कोरोनाविषाणू बाधा झाल्यामुळे मृत्यू पावले आहेत. त्यांच्या दुःखद निधनाने मीही तीतकाच व्यथित झालो आहे. जेवढे त्यांचे कुटुंबीय…व्यथित झाले आहे. याबद्दल कुणी शंका घेण्याच कारण नाही. हा विषय ईथ संपला असेही नाही. खरतर इथूनच हा विषय सुरू होतो आहे.

मित्रानों आपण पत्रकार/वार्ताहर /बातमीदार/ संपादक /सहसंपादक /उपसंपादक /छायाचित्रकार /कॅमेरामन /डीटीपी आॅपरेटर या सर्वांनी आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत काय याचा विचार करण्याची गरज आहे. हा विषय इथी मी मांडतो आहे. याचा अर्थ मी प्रामाणिक आहे. असे मानत नाही. समाजाच्या प्रति पत्रकार म्हणून आपण त्याचे (समाजाचे) प्रश्न शासन आणि प्रशासन यांच्या दरबार सतत मांडतो काय?

corona
कोरोना हे नैसर्गिक संकट नाही,कृत्रिम बाॅब प्रमाणे चिनने हा विषाणू सर्वत्र पसरवला.विस्तारवादाचे प्रभावी हत्यार म्हणून या विषाणूचा प्रयोग केला

शासन आणि प्रशासनातील माणस करत असलेल्या चुका चव्हाट्यावर मांडतोत काय? समाज व्यवस्थेतील नितीमूल्य जोपसन्या विषयी आपण पत्रकारीतेच्या माध्यमातून सक्रिय आहोत काय? मुल्यांचा ऱ्हास होईल. अस वर्तन करण्याऱ्यांना आपली कितपत जरब वाटते. पत्रकारीतेची जरब वाटत नाही. म्हणून व्यवस्था बीघड गेली आहे. याच कारण पत्रकार मंडळी भेट वस्तू घेणे, रात्रीच्या पार्ट्या करणे, माध्यमात पेड न्युज करणे, प्रवासात लक्झरी गाड्या मिळवणे, यामुळे कुणाला कुणाची भिती राहीली नाही.

अप्रत्यक्षपणे अनैतिक कारभारात पत्रकार सहभागी झाले आहेत. अस आपणास वाटत नाही? कोणत्याही क्षेत्रात कडवी तपस्या केल्याशिवाय नावलौकिक मिळत नाही. दबदबा निर्माण होत नाही. याचे विपरीत परिणाम समाजाला भोगावे लागतात. पत्रकार हा ही एक समाजाचा घटक आहे. त्यामुळे पत्रकारांवर आलेले कोणतही संकट तीतकीच त्रासदायक आहे. याचा विचार केलाय काय? आदर्श पत्रकारीतेचे पथ्य आपण पाळतो आहोत काय?

आपल्या पैकी काहीजण बातम्यांच्या शोधात या क्षेत्रातील ग्लॅमरचा लाभ मिळवण्यात बेधूंद आहेत. आपल्यावर ही वेळ का आली आहे. ती येण्याच कारण काय? याचा गंभीरपणे विचार केलाय काय? आज पाच दहा एकर शेती असलेला शेतकरी वर्षभर फक्त चटणी भाकर सुखाने खाऊ शकत नाही. त्याच्या कांही समस्या आहेत काय? त्या समस्या शासनाला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न आपण केला आहे का?

सामान्य माणूस आपल्या मुलांच शिक्षण, आरोग्य घर संसार कसा सांभाळत असेल याचाही विचार करणारी पत्रकारीता केली आहे काय? नाही केली. ज्याच्या हाती सत्ता (याला बरेच लोक अपवाद आहेत. ऊदा. तुकाराम मुंडे असे वगळून) तो आज भ्रष्टाचार करतो आहे. हा भ्रष्टाचार संपवावा म्हणून यावर कधी आवाज उठवला आहे काय? नाही केला. जर हे करीत आलो असतोत तर शासन व्यवस्था एवढी मुजोर झाली नसती.

आपली निष्कलंक पत्रकारीता शेवटचे घटका मोजत आहे. आपण आपल्याला निष्ठा अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रति वाहण्याचे बंद करावे. चुकीच्या कार्यपद्धती वर जोरदार आसुढ ओढावेत. मधीच पाणी तोड करू नये, चांगली व्यवस्था अंतिम वेळे पर्यंत कशी सुरू ठेवता येईल. याचा विचार करून पत्रकारीतेत वावरलोत तरच शासन व्यवस्था कांही अंशी सुधारले. अन्यथा समाज आणि आपण सर्व असेच भरडले जानार आहोत.

जरा भानावर या!

ANAND KALANKAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *