कंधार ; प्रतिनिधी
तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत मंडळ पेठवडज अंतर्गत मौजे- मंगनाळी व टोकवाडी येथे सक्षम ग्राम चला जाऊ गावाकडे कृषी योजनांचा माहिती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला सदर मेळाव्यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
यात मा.गुट्टे साहेब (मंडळ कृषी अधिकारी पेठवडज) यांनी PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग व विविध यांत्रिकीकरण योजनांची माहिती दिली .तसेच विठ्ठल गित्ते (तालुका कृषी अधिकारी कंधार) यांनी फळबाग लागवड, यांत्रिकीकरण ,सिंचन ,PMFME… PM किसान E KYC , ठिंबक सिंचनाचे महत्त्व, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पिकावरील रोग व त्यावरील उपाय… इ.बद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली .
सदर मेळाव्यासाठी सौ. गिरजाबाई अभंगे (सरपंच मंगनाळी ) बाबुराव शिंदे (उपसरपंच) गोविंदराव शिंदे (पोलीस पाटील) विश्वंभर शिंदे (चेअरमन) दिगंबर अभंगे (तंटामुक्ती अध्यक्ष) इ..प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
तसेच श्री. माळी साहेब (कृ.स) श्री .पवार साहेब (कृ.स) श्री.शेख साहेब( कृ.स) सौ.पूजा कदम- गव्हाणे मॅडम (कृ. स)विनोद पुलकुंडवार (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक) उपस्थित होते .मेळाव्याची प्रस्तावना व सूत्रसंचालन मा. श्री सुरवसे साहेब (कृषी पर्यवेक्षक) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.संभाजी वडजे (कृ. स) यांनी केले .