कंधार : प्रतिनिधी
कंधार येथील छोटी दर्गा येथे तीन महिन्यापासून आई-वडिलांसह वास्तव्यास राहत असताना हजर मिरासाब कुरेशी या ३२ वर्षीय व्यक्तीचा शहरातील जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी २ च्या सुमारास घडली. तलावात मृत्यूच्या घटणा गेल्या तिन वर्षापासून ऑगस्ट महिन्यात च घडत आहेत , गेल्यावर्षीच MIM कंधार तालुकाध्यक्ष मोहम्मद हामेददोदद्दीन यांनी तलावास फिन्सींग तार अथवा संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली होती परंतू तहसिल प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही , प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरील दुर्घटणा झाली अशी प्रतिक्रिया MIM कंधार तालुकाध्य मोहम्मद हामेददोदद्दीन यांनी दिली .
कंधार येथील छोटी दर्गा येथे तीन महिन्यापासून मयत हजर मिरासाब कुरेशी सर्व (रा. म्हैसा तेलंगणा) डोक्यावर परिणाम झाल्याने व मानसिक संतुलन बिघडल्यामुळे श्रद्धेपोटी आई-वडिलांसह वास्तव्यात राहत होते. ३० ऑगस्ट रोजी मयतास जास्त तणाव आल्याने वेड्याच्या भरात २ च्या सुमारास शहरातील जगतुंग तलावात बुडून मरण पावला. मयताचे वडील मिरासाब अकबर कुरेशी यांनी दिलेल्या माहितीवरून कंधार पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक उप पोलीस निरीक्षक आर. यु. गणाचार्य हे करीत आहेत.