खरं तर आज शिक्षक दिन आहे.. मी त्यावर लिहीणार होते पण पुरूष हृदय लिहावं वाटलं कारण हेच माझे शिक्षक आहेत..
हेच मला रोजच्या जगण्यात मार्गदर्शन करतात.. अगदी लिखाणात सुध्दा.. मी साडी नेसावी की वेस्टर्न घालावं ,मी कशी दिसते , मी कशावर लिहावं , आणि विषय सुध्दा यांच्याचमुळे सुचतात..
अगदी आता आलेला ताजा मेसेज ,मॅम तुम्ही मॅऱीड नसाल तर माझ्याशी लग्न कराल का हो , मला तुम्ही खुप आवडता आणि साडीत तर एक नंबर दिसता..त्यावर त्याला सांगावं वाटतं जास्त नाही रे फक्त २५ वर्षापुर्वी भेटला असतास तर तुझ्याशीच लग्न केलं असतं… बघु पुढच्या जन्मी काय जुगाड जमवता येतं का.. तोपर्यंत तु लग्न करु नकोस हा..
पुस्तक ऑर्डरसाठी असलेल्या नंबरवर मी समजुन मेसेजेस करतात आणि स्वतः तरी तोंडावर पडतात किवा मला पाडतात . सकाळी सकाळी gm चे अनेक मेसेजेस येतात त्यावर सचिनने लिहीलं This no. Is for books booking .. pl..dont send gm , gn and photos.. त्यावर एकाने लिहीलं , माझा फोटो हवाय का मॅम ??.. कसा पाठवु ??.. टीशर्ट मधला चालेल का ??.. बरोबर रे तुझी चुक नाही..चुक आमचीच आहे मायच्या भाषेत लिवायला हवं हुतं भावा..
समदी गडबड हुन बसती..
एकाने लिहीलं होतं , मॅम सीस्टीमेटीक सेक्सचं ट्रेनींग देता का तुम्ही ??.. आणि कुठे देता ??.. पुस्तकांची नावं पाहिल्यावर एक जणाने विचारलं, ह्या गोळ्या कुठे मिळतात ?? आणि कशासाठी आहेत ??.. मी सुधीरबुधीर झालेय यांना काय उत्तर देउ.. आपल्याकडे इतका अडाणीपणा आहे का ??.. की याला अजुन काय म्हणू..
सोनल मॅडम , माझा प्रॉब्लेम आहे विचारु का ??.. तुम्ही काउंसीलींग करता का ?? ,, मी फ्री काउंसीलींग करत नाही म्हटल्यावर होका.. पुढें काहीही नाही.. सगळं कसं रे फुकट मिळेल..
पुस्तके ol मागवता येतील का ?? .. मला घरी नको आहेत.. अरे भावा ,, पुस्तके ol मागव किवा कशीही मागव घरीच येणार ना.. त्याला काय म्हणायचं होतं काहीही कळलं नाही.. माझ्या आईवडीलाना न दाखवता वाचायची आहेत ,, त्यावर सचिन म्हणाला ,,आधी त्यांना वाचायला द्या आणि मग तुम्ही वाचा त्यावर तो म्हणाला , मग मला ते घरातुन हाकलुन देतील.. अशा विचारानी आपली प्रगती कशी व्हायची?.. आपल्याकडे धाकातुन आणि अडाणीपणातुन संस्कार आले आहेत ज्याचं वाईट वाटतं..
मित्रांनो तुम्हीच माझे शिक्षक मी बिचारी तुम्हाला काय ज्ञान देणार.. तुमच्या करामती पाहूनच मी लिहु शकते..मनापासून शुभेच्छा..
सोनल गोडबोले