कंधार ; ( धोंडीबा मुंडे )
गेल्या दोन महिण्यापासून पावसाने दगा दिल्यामुळे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे बेहाल झाले असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्यामुळे बैल-पोळा कसा साजरा करावा ? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला असून त्यामुळे तालुक्यातील बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले .
व्यापार पेठेत मंदी;गेल्या काही दिवसापासून कंधारच्या व्यापार पेटीवर मंदी जाणवत असून बैलाचा साज विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात शिंगाराचे साहित्य खरेदी केले असून हे साहित्य विक्री होईल, की नाही,अशी भीती या व्यापारी वर्गातून बोलले जात आहे,
बैलपोळा हा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येणारा पोळा हा मोठा सण देशभरात साजरा केला जातो .
पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या शेतातील मशागतीची कामे ही बैल-जोडीच्या साह्यानेच केली जात होती.शेतातील पिकलेले धान्य वाहून आणण्यासाठी बैल-जोडीचा वापर सरास होत असे; मात्र सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारे प्रगत अवजारे वापरून कमी वेळात जलद कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने होत आहेत.सध्या बाजारा मध्येही सर्जा-राजाला सजविण्यासाठी सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहे; परंतु बोटांवर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांकडे बैल-जोडी पाहायला मिळत असल्याने मोजकेच शेतकरी खरेदी- विक्री करताना दिसत आहेत.काही काळानंतर हा आपला सर्जा-राजा लुप्त होणार की काय ? असा प्रश्न ही सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे,पोळा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजार आता पासूनच सजला आहे; मात्र यंदा दुष्काळाचे सावट असल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसत आहे.यंदा पाऊस अत्यल्प असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले कोरडेठाक असल्याने बैलांना अंघोळ घालणार कुठे ? असा प्रश्न पडला आहे.
बैलांची संख्या घटली
२०१२ च्या पशुजनगणनेनुसार बैलांची संख्या ही २०१९ च्या पशू जनगणनेनुसार सात वर्षांत घटली आहे.तर नव्याने पशू जनगणना झाल्यास हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
शेती करण्यासाठी आता बैलांचा पूर्वीसारखा वापर होत नाही. तंत्रज्ञान अवगत झाल्याने बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे .