बलिदान नको, जीवनदान द्या – एक मराठा,लाख मराठा!

कधी जर माझं एक वेळेचं जेवण चुकलं तरी माझी आई कासावीस होते, रोजच्या जेवणाला थोडा उशीर केला तरी बायको ओरडते. विचार करा आज जरांगे पाटील तब्बल १५ दिवस उपाशी आहेत. त्यांची आई, बायको आणि लेकरांच्या मनाची काय अवस्था असेल. आज त्यांची तब्ब्येत खालावल्याची बातमी समजली आणि डोळे आपसूक पाणावले.

 

 

एवढी दुर्दम्य ईच्छाशक्ती, धैर्य, सहनशीलता, निश्चय, त्याग सोपी गोष्ट नाही. गेली पंधरा दिवस पाटील उपाशी आहेत पण उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या पोटाला अन्न गोड लागत नाही.

 

पाटील तुमच्या रूपाने मराठा समाजाला एक सर्वसामान्य लोकांमधला निस्वार्थी लढवय्या नेता मिळालाय. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल असेही थांबलोच होतो अजून थोडे थांबू पण “तुमच्या बलिदानापेक्षा समाजाच्या हितासाठी, लढाईसाठी तुम्ही जिवंत असणं जास्त गरजेचे आहे.” पाटील, तुम्ही सिस्टीमच्या आत या किंवा बाहेरून लढा पण समाजाला जितकं आरक्षण गरजेचं आहे तेवढेच तुम्हीही गरजेचे आहात हेही ध्यानात ठेवा.

 

तुमचा जीव आता फक्त तुमचा राहिला नाही तो सकल मराठ्यांचा झालेला आहे. तुमची ही ढासळलेली प्रकृती पाहून प्रत्येक सच्चा मराठ्यांची हीच भावना असेल याची खात्री आहे.

जय जिजाऊ!
जय शिवराय!

*—-रमेश पवार*
*नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *